१५ जागेसाठी ३३ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:27 IST2021-01-14T04:27:03+5:302021-01-14T04:27:03+5:30
येथे आण्णासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर ग्रामविकास आघाडी तर सयाजीराजे हुंबे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन ग्रामविकास आघाडी अशी सरळ लढत ...

१५ जागेसाठी ३३ उमेदवार रिंगणात
येथे आण्णासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर ग्रामविकास आघाडी तर सयाजीराजे हुंबे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन ग्रामविकास आघाडी अशी सरळ लढत होत आहे. याशिवाय, वाॅर्ड क्रमांक १ मध्ये बाळासाहेब हाडूळे व संग्राम लोखंडे तर वाॅर्ड क्र. २ मध्ये वंचित आघाडीच्या वतीने शिवाजी चव्हाण हे देखील निवडणुकीला सामोरे जात आहेत. यंदा प्रथम हायटेक डिजीटल प्रचार होत आहे. घरोघरी जावून गाठीभेटी घेण्यावर प्रत्येक उमेदवार भर देत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पॅनलच्या वतीने वाजत गाजत रॅली काढून गावातील ग्रामदैवताना श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला. तोडीस तोड म्हणून एकमेव अपक्ष उमेदवार बाळासाहेब हाडुळे यांनीही रॅली काढून प्रचाराचा शुभारंभ केला आहे.
दोन्ही पॅनलच्या वतीने यावर्षी युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली गेली आहे. शिवसेना पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रामविकास आघाडीच्या वतीने निलेश चव्हाण, रवीराजे देशमुख, प्रवीण देशमुख, युवराज हुंबे तर राकाँ, भाजपा पुरस्कृत परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या वतीने गणेश चव्हाण, आनंद हुंबे, महेश चव्हाण, सयाजीराजे हुंबे हे नशिब आजमावत आहेत.
चौकट......
५०४६ मतदार
ईट, पांढरेवाडी, झेंडेवाडी या तीन गावची मिळून ईट ग्रामपंचायत असून, येथील पाच वाॅर्डातील पंधरा सदस्य निवडीसाठी ३३ उमेदवार नशिब आजमावत आहेत. या निवडणुकीत ५ हजार ४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यात २ हजार ३०४ महिला तर २ हजार ७४२ पुरुष मतदारांचा समावेश आहे.