Video - मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 04:29 PM2023-09-17T16:29:06+5:302023-09-17T16:30:45+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर ते मुंबई अशी मराठा वनवास यात्रा काढण्यात आली हाेती. मात्र, आरक्षण काही मिळाले नाही.

2 youths attempted self-immolation in Dharashiv for Maratha reservation | Video - मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Video - मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

googlenewsNext

धाराशिव : मराठा आरक्षणाची मागणी करीत दाेन तरुणांनी अंगावर पेट्राेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ध्वजाराेहण साेहळा सुरू असताना घडली. पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने माेठा अनर्थ टळला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर ते मुंबई अशी मराठा वनवास यात्रा काढण्यात आली हाेती. मात्र, आरक्षण काही मिळाले नाही. सरकारच्या या भूमिकेविरूद्ध संताप व्यक्त करीत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ध्वजाराेण साेहळा सुरू असतानाच वनवास यात्रेचे संयाेजक सुनील लागणे व प्रताप पाटील या दाेघांनी अंगावर पेट्राेलन ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पाेलिसांनी वेळीच धाव घेत त्यांना राेखले. त्यामुळे माेठा अनर्थ टळला. मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यावे, अशी मागणी करतानाच सरकारने मराठा समाजाला आजवर गंडवण्याचे काम केल्याचा आराेपही त्यांनी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वराजाराेण साेहळ्याला पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे, पाेलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

Web Title: 2 youths attempted self-immolation in Dharashiv for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.