१४ वर्षीय मुलीवर दहावीच्या मुलाचा जबरी अत्याचार; २२ दिवसानंतर घटना आली उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 18:27 IST2018-09-24T18:26:48+5:302018-09-24T18:27:33+5:30
पाणी भरण्यासाठी हातपंपावर गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीला जबरदस्तीने पडक्या वाड्यात नेत तिच्यावर जबरी अत्याचार केला

१४ वर्षीय मुलीवर दहावीच्या मुलाचा जबरी अत्याचार; २२ दिवसानंतर घटना आली उघडकीस
येणेगूर ( उस्मानाबाद ) : पाणी भरण्यासाठी हातपंपावर गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीला जबरदस्तीने पडक्या वाड्यात नेत तिच्यावर जबरी अत्याचार करणाऱ्याविरूध्द मुरूम पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उमरगा तालुक्यातील येणेगूर (उस्मानाबाद) येथे २२ दिवसांपूर्वी घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गावातील युवकांनी रविवारी सकाळी गाव बंदची हाक देत निषेध रॅली काढली.
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील एक १४ वर्षीय मुलगी २२ दिवसांपूर्वी गावातील हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली होती़ त्यावेळी तेथे आलेल्या एका १६ वर्षीय मुलाने तिला जबरदस्तीने पडक्या वाड्यात ओढत नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला़ घटनेची माहिती कोणास सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिली़ पीडित मुलीने २२ दिवसानंतर आईला घटनेची माहिती दिली़ नातेवाईकांनी मुरूम पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार सांगितला़ या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून त्या मुलाविरूध्द रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मुरूम पोलीस ठाण्याचे सपोनि मुस्तफा शेख, तपासाधिकारी पोउपनि डी़पी़सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच येणेगूर येथील युवकांनी संताप व्यक्त करीत रविवारी सकाळी गाव बंदची हाक देत निषेध रॅली काढली़ दुपारपर्यंत गावातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला़
आरोपी शाळेतही गैरहजर
या घटनेतील आरोपी हा गावातीलच एका शाळेत शिकतो़ मात्र, दहावीचे वर्ष असतानाही तो सतत गैरहजर राहत असल्याने शाळेने त्याला काढून टाकले होते, अशी माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली़