१३५ दिव्यांगांना मिळाले कृत्रिम अवयव वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST2021-08-01T04:30:04+5:302021-08-01T04:30:04+5:30

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथे भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा परिषदेतील जिल्हा समाजकल्याण विभाग व निवासी दिव्यांग ...

135 persons with disabilities received artificial limbs | १३५ दिव्यांगांना मिळाले कृत्रिम अवयव वितरण

१३५ दिव्यांगांना मिळाले कृत्रिम अवयव वितरण

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथे भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा परिषदेतील जिल्हा समाजकल्याण विभाग व निवासी दिव्यांग शाळा यांच्यातर्फे तसेच भारतीय नौवहन निगम लिमिटेड यांच्या सीएसआर निधीमधून लोहारा तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले.

अध्यक्षस्थानी ॲड. रावसाहेब पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, समाजकल्याण विभागाचे भारत कांबळे, सास्तूरचे सरपंच यशवंत कासार, अलिम्कोचे सल्लागार कमलेश यादव, शामललित यादव, माकणी केंद्राचे केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे, तुळजाभवानी मतिमंद बालगृहाचे सचिव बालाजी शिंदे, लातूर येथील आश्रय निवासी दिव्यांग विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत कुकाले, भगवान वाघमारे, निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बी. टी. नादरगे, आदींची उपस्थिती होती.

या प्रसंगी तालुक्यातील १३५ दिव्यांगांना व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, श्रवणयंत्र, कृत्रिम पाय, कॅलिपर्स, कृत्रिम हात, अंधकाठी, कुबड्या, ब्रेल किट, एमआर किट, वॉकर, इत्यादी साहित्य देण्यात आले. कार्यक्रमासाठी प्राचार्य भरत बालवाड, प्रा. बाबूराव ढेले, रमाकांत इरलापल्ले, राजकुमार गुंडुरे, विठ्ठल शेळगे, कपिल रेड्डी, अंजली चलवाड, प्रयागताई पवळे, प्रवीण वाघमोडे, एम. पी. मुस्कावाड, एन. सी. सूर्यवंशी, गोरख पालमपल्ले, शंकर गिरी, सूर्यकांत कोरे, दगडू सगर, सविता भंडारे, किरण मैंदर्गी, सुनीता कज्जेवाड, भीमराव गिरदवाड, ज्ञानोबा माने, निशांत सावंत, संभाजी गोरे, आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: 135 persons with disabilities received artificial limbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.