शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Zomato डिलिव्हरी बॉयची भोसकून हत्या, रक्ताने माखलेला स्वतः पोहोचला रुग्णालयात पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 18:33 IST

Attack on Zomato delivery boy : तीन तरुणांनी त्याला वाटेत अडवून पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. हा तरुण झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. रात्री उशिरा करोलबागेत ऑर्डर पोहोचवणार होता. त्यानंतर तीन तरुणांनी त्याला वाटेत अडवून पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.रक्ताच्या थारोळ्यात पडलेले सुनील वर्मा स्वत: मोटरसायकलवरून अरविंद हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तेथे गार्डच्या मदतीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती नाजूक आहे. त्यानंतर त्याला तेथून एमवाय हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. मृताचे वय २२ वर्षे असून तो राजगडच्या भगोरा गावचा रहिवासी होता. त्याचवेळी अतिरिक्त डीसीपी राजेश रघुवंशी यांनी या प्रकरणावर सांगितले की, डिलिव्हरी बॉयच्या हत्येचा तपास सुरू आहे. रात्रीच्या सुमारास तिघांनी त्याच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत त्याच्यावर चाकूने वार करून जखमी केले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशZomatoझोमॅटोDeathमृत्यू