Zero Movie Controversy: 'झिरो' सिनेमातील वादग्रस्त दृश्यांची पाहणी करून अहवाल सादर करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 18:33 IST2018-11-30T18:31:38+5:302018-11-30T18:33:46+5:30
मुंबई हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाने दिले निर्देश

Zero Movie Controversy: 'झिरो' सिनेमातील वादग्रस्त दृश्यांची पाहणी करून अहवाल सादर करा
मुंबई - झिरो चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता शाहरुख खानच्या हातात कृपाण दाखवण्यात आले आहे. त्यामुळे शीख धर्मीयांच्या भावना दुखवाल्याचा आरोप करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटातील टीझरमधून वरील दृष्ये वगळण्यात यावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. वकील अमृतपाल सिंह खालसा यांनी ही याचिका दाखल केली आहे.
मुंबई हायकोर्टात आज ‘झिरो’ सिनेमाविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. कोर्टाने सेन्सॉर बोर्डाला वादग्रस्त दृष्यांची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पाहणी करुन याबाबतचा अहवाल येत्या 18 डिसेंबरला कोर्टात सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 30, 2018