भयंकर! विवाहित महिलेसोबत युट्यूबर नको त्या अवस्थेत दिसला; तोच पतीचा शेवटचा दिवस ठरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:13 IST2025-04-15T11:13:08+5:302025-04-15T11:13:26+5:30
रवीना सोशल मीडियावर खूप सक्रीय होती. रवीना रावाने तिचे इन्स्टाग्रामवर खाते होते. त्यावर ३४ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.

भयंकर! विवाहित महिलेसोबत युट्यूबर नको त्या अवस्थेत दिसला; तोच पतीचा शेवटचा दिवस ठरला
भिवानी - मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडासारखा आणखी एक घटना समोर आली आहे. हरियाणाच्या भिवानी येथे घडलेल्या प्रकारानं सगळेच हैराण आहेत. युट्यूबर सुरेश आणि रवीना या दोघांनी मिळून पती प्रवीणचा गळा दाबून खून केला. परंतु मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रात्र होईपर्यंत आणि सर्व झोपेपर्यंत वाट पाहिली. युट्यूबर सुरेश आणि विवाहित महिला रवीना या दोघांना पती प्रवीणने नको त्या अवस्थेत पाहिल्याचं तपासात उघड झाले. त्यातूनच प्रवीण आपलं पितळ उघड करेल या भीतीने रवीना आणि सुरेशने मिळून ओढणीने त्याची गळा दाबून हत्या केली.
पोलीस तपासात आरोपी युट्यूबर सुरेशने सांगितले की, रवीनासोबत माझी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर आम्ही एकत्र शॉर्ट व्हिडिओ बनवत होतो. जवळपास दीड वर्ष रवीना माझ्या संपर्कात होती. ज्याची भनक पतीला लागली होती. हत्येच्या दिवशी रवीनाच्या घरी प्रवीणने आम्हा दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर पतीची हत्या केली गेली असं त्याने म्हटलं. प्रवीणच्या हत्येनंतर दिवसभर पत्नी रवीना काहीच न झाल्यासारखे वागत होती. जेव्हा नातेवाईकांनी प्रवीण कुठे आहे विचारले तेव्हा माहिती नसल्याचं नाटक तिने केले. रात्री अडीच वाजता जेव्हा सर्व झोपले होते तेव्हा बाईकवरून रवीना आणि सुरेश यांनी मृतदेह ६ किमी दूर फेकून दिला.
रवीना २५ मार्चला घरी होती, दिवसभर प्रवीणसोबत तिचे भांडण झाले होते परंतु या वादात रवीनाने तिच्या प्रियकरासोबत मिळून पती प्रवीणची हत्या केल्याची कल्पनाही कुणी केली नसेल. २८ मार्च रोजी प्रवीणचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला त्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला. ३५ वर्षीय प्रवीणचं ३२ वर्षीय रवीनासोबत लग्न झाले होते. त्यांना ६ वर्षाचा मुलगा होता. प्रवीणच्या हत्येनंतर मुलाच्या डोक्यावरील बापाचं छत्र हरपलं आहे तर हत्येच्या आरोपात आई रवीना जेलमध्ये गेल्याने आईच्या प्रेमापासूनही तो वंचित आहे. ६ वर्षाचा मुलगा आता त्याच्या आजी आणि काकांसोबत राहतो.
इन्स्टाग्रामवर रवीना होती सक्रीय
रवीना सोशल मीडियावर खूप सक्रीय होती. रवीना रावाने तिचे इन्स्टाग्रामवर खाते होते. त्यावर ३४ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यात शॉर्ट व्हिडिओ आणि डान्स व्हिडिओ अपलोड केलेत. त्याशिवाय युट्यूबवरही तिचे चॅनेल होते. पतीने बऱ्याचदा तिला विरोध केला तरीही तिने इन्स्टाग्राम सोडले नाही. प्रवीणची हत्या २५ मार्चला त्याच्या घरीच झाली होती. प्रवीणचा मृतदेह ६ किमी लांब कसा सापडला यावर कुटुंबाने शंका उपस्थित केली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांच्या घरातून एक दुचाकी आणि त्यावर संशयित आरोपी दिसले. रवीनाने चेहऱ्यावर कपडा बांधला होता. बाईकवर दोघांच्यामध्ये प्रवीणचा मृतदेह होता. पोलिसांनी जेव्हा खाकीचा धाक दाखवला तेव्हा रवीना आणि तिच्या प्रियकराने गुन्हा कबूल केला.