प्रेम प्रकरणातून युवकाचा खून; शेगावातील घटना ; एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 23:48 IST2019-03-22T23:48:01+5:302019-03-22T23:48:29+5:30
शेगाव - शहरातील तीन पुतळे परिसरात 22 वर्षीय युवकाचा युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता ...

प्रेम प्रकरणातून युवकाचा खून; शेगावातील घटना ; एकास अटक
शेगाव - शहरातील तीन पुतळे परिसरात 22 वर्षीय युवकाचा युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा शहरात आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.
अक्षय अशोक वानखडे वय 22 असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यास तिघांनी छातीत व पोटावर चाकूने वार करून भोसकले. मृतकाचा मोठा भाऊ आशिष याने काही दिवसांपूर्वी एका मुलीस पळवून नेले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केल्याची चर्चा आहे. दरम्यान शुक्रवारी राग मनात धरून अक्षय ला मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मृतक मुलाचे आईने शहर पो स्टे ला दिली. त्यावरून ठाणेदार सुनील हुड पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी युवकाचे प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी स्थानिक सईबाई मोटे रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी भारत शेगोकार यास चाकूसह अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस रात्री घेत होते. घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)