शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

दुबईतून पाकिस्तानमार्गे आलेल्या तरुणास दिल्ली विमानतळावरून अटक, खळबळजनक खुलासे

By पूनम अपराज | Published: December 25, 2020 8:22 PM

Crime News : देशद्रोहाचा आरोप असून त्याचे अनेक खुलासे झाले

ठळक मुद्देतो दुबईतून पाकिस्तानमार्गे दिल्ली विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी आरोपीला विमानतळातूनच अटक केली. मूळचा भैन्सवाल गावचा विकास वर्मा उर्फ ​​मोहम्मद विकास, जो आता संबंधित पोलीस स्टेशन परिसरातील सेक्टर -10 स्थित वर्धमान गार्डनिया येथील राहत असून तो परदेशातील व्यक्तीच्या संपर्कात 

पाकिस्तानमधील एका संघटनेशी संपर्क साधल्यानंतर सोनीपत सदर पोलिस ठाण्यात परिसरात राहणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर आरोपी दुबईहून पाकिस्तानात पळून गेला. मात्र, तो दुबईतून पाकिस्तानमार्गे दिल्ली विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी आरोपीला विमानतळातूनच अटक केली.

त्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे आणि त्याला रिमांडवर घेण्यात आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उजेडात येईल. मूळचा भैन्सवाल गावचा विकास वर्मा उर्फ ​​मोहम्मद विकास, जो आता संबंधित पोलीस स्टेशन परिसरातील सेक्टर -10 स्थित वर्धमान गार्डनिया येथील राहत असून तो परदेशातील व्यक्तीच्या संपर्कात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. तो देशद्रोहाचा कट रचत आहे. जून महिन्यात पोलिसांनी त्याच्याविरूद्ध माहिती मिळाली. पाकिस्तानमधील जमावाशी त्याचा संपर्क झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.नंतर पोलिसांना कळले की, आरोपी दुबईहून पाकिस्तानात गेला आहे. तेथे त्याने एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केले. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक गुंतले होते. दरम्यान, आरोपी दिल्ली विमानतळावर येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्याला सोनिपत पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी आयपीसी कलम १२४ अ आणि  153 ब अन्वये अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्याला रिमांडवर घेतले आहे. पाकिस्तानमधील संघटनेशी त्याच्या संपर्कांची माहिती संकलित केली जाईल. पोलिसांनी आरोपीला सात दिवसांचा रिमांड सुनावला आहे. 

 

पाकिस्तानी महिलेशी लग्न केलेअटक आरोपीने फेसबुकवरील मैत्रीनंतर एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केले, त्यामुळे शंका आणखी वाढली. आरोपीने बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून त्याला संगणकाचे चांगले ज्ञान असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्याने बंदी घातलेल्या संघटनेचा मेसेज पुढे पाठविला होता, त्यामुळे तो त्या संस्थेच्या समूहात सामील झाला. त्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होते.इतर आरोपींशी संपर्क झाल्याचा खुलासा, त्यांच्या शोधात पोलीस अटक केलेल्या आरोपी विकास वर्मा उर्फ ​​मोहम्मद विकास याच्याशी अन्य लोक संपर्कात आल्याचा खुलासा झाला आहे. यामुळे पोलीस पथक सतत त्यांच्या शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या प्रकरणातील अन्य लोकांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

सेक्टर -10 भागात राहणाऱ्या तरूणाचा पाकिस्तानमधील एका बंदी घातलेल्या संस्थेशी संपर्क असल्याचे वृत्त आहे. ज्यामध्ये आरोपीवर कारवाई केली आहे. त्याला रिमांडवर घेण्यात आले आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणावर शिक्कामोर्तब होईल. चौकशीत विदेशात त्याच्याशी संपर्क साधण्यामागील कारणे देखील निश्चित केली जातील. त्याच वेळी, तो इतर कोणकोणत्या व्यक्तींशी संपर्कात होता याचा शोध घेतला जाईल. - जश्नदीप सिंह रंधावा, एसपी सोनीपत

टॅग्स :Arrestअटकdelhiदिल्लीPoliceपोलिसPakistanपाकिस्तान