शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

भावाच्या कानशिलात लगावल्याने युवकाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 20:25 IST

Murder Case : चाकूने शरीरावर घातले दहा घाव: एकाला अटक, अल्पवयीन ताब्यात, जेवड नगरातील घटना

ठळक मुद्देपोलीस सूत्रानुसार, अमन किशोर खंडारे (२०, रा. जेवड नगर) असे मृताचे नाव आहे. डिक्यावच्या अल्पवयीन भावासोबत मृत अमनचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर अमनने अल्पवयीनाच्या कानशिलात लगावली.

अमरावती: क्षुल्लक कारणावरून चुलत अल्पवयीन भावाला मृताने कानशिलात लगावली म्हणून त्याची चाकूने शरीरावर सपासप दहा घाव घालून दोघांनी निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास राजापेठ ठाणे हद्दीतील जेवड नगरात घडली. लॉकडाऊन असतानाही शहरात खुनाची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली.पोलीस सूत्रानुसार, अमन किशोर खंडारे (२०, रा. जेवड नगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी डिक्याव ऊर्फ अभिषेक ऊर्फ मामू राकेश ऊर्फ रमेश डिक्याव (२१, रा. पोस्टमन कॉलनी, जेवड नगर) व एका अल्पवयीनाविरुद्ध राजापेठ पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२,३४ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी पोलिसांनी डिक्यावला घटनेनंतर जेवड नगरातून अर्धा तासात अटक केली. तर अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.डिक्यावच्या अल्पवयीन भावासोबत मृत अमनचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर अमनने अल्पवयीनाच्या कानशिलात लगावली.

अल्पवयीनाने ही बाब मोठा भाऊ डिक्यावला सांगितली. यानंतर अल्पवयीनाजवळ आधीच असलेला चाकू डिक्याव घेऊन घटनास्थळावर आला. त्याने अमनवर चाकू हल्ला चढविला. अमन आपला जीव वाचविण्याकरिता रस्त्याने पडत होता. तर डिक्याव त्याच्या पाठीवर चाकूने घाव घालत होता. त्यानंतर डिक्यावने तेथून पळ काढला. रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेल्या अमनला नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले; परंतु येथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटना गंभीर असल्याने पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव, एसीपी शिवाजी धुमाळ, राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. यानंतर तपासाची सूत्रे फिरवून तातडीने अर्ध्या तासातच डिक्यावला अटक तर अल्पवयीन आरोपीसह ताब्यात घेतले. डिक्याव हा जेवड नगरनजीकच असलेल्या पोस्टमन कॉलनीत राहत असून, तो स्विपरचे काम करतो. डिक्यावला पीसीआर मिळण्याकरिता शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू