शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव पठार येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून ; पाच जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 11:44 IST

पूर्वी झालेल्या भांडणातुन तरुणाचा कोयता आणि चाकूने वार करून खून केल्याची घटना आंबेगाव पठारमधील साई सबुरी चौकाजवळ घडली.

पुणे : पूर्वी झालेली भांडणातुन तरुणाचा कोयता आणि चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास आंबेगाव पठारमधील साई सबुरी चौकाजवळ घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दाखल असून त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विनायक मारुती पवार (वय २३ वर्ष रा. शनीनगर कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गणेश मारुती शिर्के (वय २७. धदा-व्यवसाय रा. स.न ६५, तळजाई वसाहत, वनशिव वस्ती रोड, पदमावती ) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार गणेश गायकवाड , विशाल कांबळे,  प्रकाश रेणुसे , बाळा शेडकर, गौरव ऊर्फ गोग्या भामरे( सर्व रा.चव्हाणनगर,शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गायकवाड याचे संदिप गेजगे याच्या बरोबर महिन्यापुर्वी भांडण झाले होते. हे भांडण मिटवण्यासाठी फिर्यादी यांचा मामे भाउ विनायक पवार याने गणेश गायकवाड यास फोन केला व त्यांचा बोलविल्यावरुन गणेश गायकवाड, विशाल कांबळे, प्रकाश रेणुसे, बाळा शेंडकर, गौरव ऊर्फ गोग्या भामरे हे आंबेगाव पठार येथील सर्वे नंबर 16 मधील साई सबुरी चौकातून उताराने येणाऱ्या रस्त्यावर नक्षत्र बिल्डिंगचे गेट समोर आले. तेथे तेथे वाट पहात थांबलेले विनायक पवार व त्याचे मित्र संदीप गेजगे व विकास धुमाळ यांना गाठून गेल्या दोन वर्षांपूर्वी चव्हाणनगर शंकर महाराज वसाहत येथे विशाल कांबळे व प्रकाश रेनुसे यांचे विनायक पवार यांच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून विशाल कांबळे, बाळा शेंडकर प्रकाश रेणुसे यांनी त्यांच्याकडील चाकू व कोयत्याने विनायक पवार यांच्या छाती, कमरेवर, उजव्या हाताच्या कोपरावर व पाठीवर डाव्या बाजूस कमरेजवळ तर गणेश गायकवाड व गोग्या भामरे यांनी फुटलेल्या जात्याच्या दगडाने विनायक यांच्या पाठीवर दगड घालून त्यांचा खून केला.  घटनेची माहिती मिळताच समीर शेख ( सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हें १), राम मांडूरके ( सहा.पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग), विष्णु पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विदयापीठ पो. स्टे), विजय टिकोळे (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-२), विष्णु ताम्हाणे , (पोलीस निरीक्षक (गुन्हे) भारती विदयापीठ पो.स्टे), जयवंत जाधव ( सहाय्यक पोलीस निरीक्षक युनिट-२), एम.एम. साळुखे (सपोनि भारती विदयापीठ पो.स्टे), चिवड शेटटी (सपो.नि. भारती विदयापीठ पो स्टे), शिवदास गायकवाड (पोलीस उप निरीक्षक भारती विदयापीठ पो.स्टे) यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एम. साळुंके करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस