शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 19:45 IST

एका १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हासेगाववाडी (ता. औसा) येथे घडली.

ठळक मुद्दे बळीराम ऊर्फ पोपट भानुदास सुरवसे (१९ रा. हासेगाववाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत दुष्काळ आणि यंदा परतीच्या पावसामुळे शेती उत्पन्नात घट झाली.

औसा (जि. लातूर) - सततची दुष्काळी परिस्थिती आणि यंदा परतीच्या पावसामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न निघाले नाही. त्यामुळे वडील उच्च शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नसल्याने निराश झालेल्या एका १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हासेगाववाडी (ता. औसा) येथे घडली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात मंगळवारी नोंद करण्यात आली आहे. बळीराम ऊर्फ पोपट भानुदास सुरवसे (१९ रा. हासेगाववाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, हासेगाववाडी येथील भानुदास सुरवसे यांना चार एकर कोरडवाहू शेती आहे. कुटुंबात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आहे. ते शेतीबरोबर मेंढी पालन करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत दुष्काळ आणि यंदा परतीच्या पावसामुळे शेती उत्पन्नात घट झाली. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली.

इयत्ता १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या बळीरामला कुटुंबियांनी पुढील शिक्षणाचा खर्च आम्हास झेपणार नाही, असे सांगितले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या बळीराम सुरवसे याने सोमवारी सायंकाळी घरातील पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसlaturलातूरEducationशिक्षणMONEYपैसा