शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी मारहाण करून अपमान केल्यामुळे तरुणाने विष प्राशन करून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 17:10 IST

Suicide Case :खाजगी काम करणारा महेश सोमवारी रात्री ७ च्या सुमारास घरासमोर उभा असताना त्याला बाजूला भांडण होताना दिसले.

ठळक मुद्दे महेश शालिकराम राऊत असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो सोमवारी पेठ कॉर्टर परिसरात राहत होता.

नागपूर : क्षुल्लक कारणावरून पोलिसांनी सगळ्यांसमोर मारहाण करून अपमान केल्यामुळे दुखावलेल्या एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सकाळी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात  दिवसभर प्रचंड तणाव होता. महेश शालिकराम राऊत असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो सोमवारी पेठ कॉर्टर परिसरात राहत होता.

खाजगी काम करणारा महेश सोमवारी रात्री ७ च्या सुमारास घरासमोर उभा असताना त्याला बाजूला भांडण होताना दिसले. त्यामुळे सुजाण नागरिकांच्या भूमिकेतून महेशने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने हुडकेश्वर परिसरातील चार्लीला कळविले. त्यानुसार त्या भागात गस्तीवर असलेले बीट मार्शल आणि चार्ली तिकडे पोहोचले. नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी महेश च्या मोबाईल नंबरवर संपर्क केला. तिकडे बॅटरी डाउन झाल्यामुळे महेशने मोबाईल चार्जिंग वर लावला होता. त्यामुळे बीट मार्शलने वारंवार संपर्क करूनही महेश जवळ मोबाईल नसल्याने तो प्रतिसाद देऊ शकला नाही. बीट मार्शलने ट्रू कॉलरवर मोबाईल धारकाचे नाव वाचले आणि त्याचा पत्ता शोधत ते महेशच्या घरासमोर पोहोचले. तेथे कोणतेही झगडा भांडण पोलिसांना दिसले नाही. महेशने जाणीवपूर्वक पोलिसांना त्रास देण्यासाठी नियंत्रण कक्षात फोन करून खोडसाळपणा केला, असा बीट मार्शलचा गैरसमज झाला. त्यामुळेच तो फोन उचलत नसावा, असाही अंदाज बीट मार्शलने बांधला. त्यामुळे घरासमोर पोहोचताच त्यांनी महेशला जाब विचारणे सुरु केले. शेजाऱ्यांसमोर त्याला मारहाणही केली. पोलिसांनी नाहक इतरांसमोर मारहाण करून अपमान केल्याची भावना महेशला अस्वस्थ करून गेली. त्या स्थितीत त्याने मध्यरात्रीनंतर विष प्राशन केले. ते लक्षात आल्यामुळे घरच्यांनी त्याला मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच महेश राऊतने आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात वायूवेगाने पसरली. त्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या. संतप्त जमाव हुडकेश्वर पोलीस ठाण्यावर धडकला. त्यांनी दोषी पोलिसांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करून घोषणाबाजी सुरू केली. मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाल्याने वातावरण चिघळण्याचे संकेत मिळाले. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातूनही मोठा पोलीस बंदोबस्त मागवून घेण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर हुडकेश्वर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. दोषी पोलिसांची नावेही स्पष्ट झाली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसnagpurनागपूर