पिंपरी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अदयाप अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 22:11 IST2021-02-01T22:10:41+5:302021-02-01T22:11:37+5:30
दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने मित्राने पोलिसांना माहिती दिली.

पिंपरी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अदयाप अस्पष्ट
पिंपरी : राहत्या घरात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. यशवंतनगर पिंपरी येथे सोमवारी (दि.१) ही घटना उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
प्रणय पुंडलिक मराठे (वय २४, रा. यशवंतनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय हा औंध येथे नोकरीला होता. तो यशवंतनगर येथे भावासोबत राहत होता. प्रणय सोमवारी घरात एकटाच असताना होता. दरम्यान त्याचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी आला. दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने मित्राने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता प्रणय घरामध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.