शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या चौकशीच्या जाचाने तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 22:20 IST

पत्नीच्या आत्महत्येसाठी जबाबदार म्हणून कारवाईसाठी पोलिसांनी दिला त्रास

ठळक मुद्देपोलिस पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची सतत धमकी

पुणे : दोन वर्षांपूर्वी पत्नीने आत्महत्या केलेल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देत वारंवार होणा?्या मानसिक त्रासाला कंटाळून  तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी धानोरीत घडली. संबधित पोलिसांवर कायदेशीर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर शनिवारी दुपारी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.शरद शिवाजी गुंजाळ (वय.४०,रा.भैरव नगर, धानोरी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.शरद गुंजाळ हा  धानोरीत राहत होता. २००७ साली त्याचा रंजना हिच्याशी विवाह झाला होता. दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीने आत्महत्या करून जीवन संपविले होते.याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.त्यावेळी रंजना हिचा भाऊ सचिन हा नंतर गुंजाळ यांच्या विरोधात तक्रार  देणार असल्याचे सांगितले होते.रंजना गुंजाळ हिच्या अकस्मात मृत्यूची निर्गती करण्यासाठी पोलीस पती शरद गुंजाळ याला वारंवार फोन करून बोलवत होते.कामामुळे येणे शक्य नसून वेळ मिळाल्यावर येईल,असे उत्तर गुंजाळ  त्यांना देत होता.चौकीत आला नाही तर पत्नीच्या गुन्ह्यात तुझ्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी पोलिस त्याला देत होते.गुंजाळ हा १० फेब्रुवारी रोजी चौकीत आल्यावर त्याला बसवून ठेवण्यात आले. तुझ्या मेव्हण्याची अजून तक्रार आली नसल्याचे सांगून घरी पाठविले. पोलिस पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची सतत धमकी देत असल्याने या त्रासाला कंटाळून शरद गुंजाळ याने शुक्रवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलीसांच्या त्रासाला कंटाळून शरद गुंजाळ याने आत्महत्या केलीअसल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला.त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार पोलिसांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. पोलिसांनी अखेर वडील शिवाजी गुंजाळ यांचा  तक्रार अर्ज घेऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.शरद गुंजाळ याच्या पश्चात वडील,भाऊ आणि दोन मुले आहेत. शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

"पत्नीच्या आत्महत्ये प्रकरणी मेव्हणाचा जबाब घेण्यासाठी शरद गुंजाळ याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते.पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून गुंजाळ याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू