गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह युवकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 20:43 IST2021-06-28T20:42:43+5:302021-06-28T20:43:14+5:30

Drugs Case : यातील साजिद शेख रफिक शेख वय 31 राहणार शंकरपावली गिरड जिल्हा वर्धा रुकसाना शेख युसुफ शेख वय 21 मीना टाऊन नागपुर अशी आरोपींची नावे आहेत.

Youth arrested for smuggling marijuana | गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह युवकाला अटक

गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह युवकाला अटक

ठळक मुद्देदोन्ही आरोपींना अटक केली. यांचे जवळ 2255  ग्राम  गांजा किंमत 22 हजार 550  व वाहन असा 83 हजाराचा  मुद्देमाल जप्त केला आहे.

चंद्रपूर : वरोराकडून भद्रावती मार्गे चंद्रपूरकडे दुचाकीने गांजा घेऊन जात असताना भद्रावती पोलिसांनी नाकाबंदी करून महिलेसह युवकाला ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.


 यातील साजिद शेख रफिक शेख वय 31 राहणार शंकरपावली गिरड जिल्हा वर्धा रुकसाना शेख युसुफ शेख वय 21 मीना टाऊन नागपुर अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे मोटरसायकल क्रमांक एम एच 31 ए यु 77 63  वाहनाने वरोराहुन चंद्रपूर कडे गांजा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्याआधारे टप्पा परिसरात नाकाबंदी केली असता यातील दोन्ही आरोपींना अटक केली. यांचे जवळ 2255  ग्राम  गांजा किंमत 22 हजार 550  व वाहन असा 83 हजाराचा  मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, सचिन गुरनुले, रोहित चीटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.

Web Title: Youth arrested for smuggling marijuana