टिकटॉकवर केलेली जीवघेणी स्टंटबाजी भोवली; तरुणाला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 21:11 IST2019-05-21T21:10:11+5:302019-05-21T21:11:30+5:30
या तरुणाचं नाव अदनान शेख (२४) असं आहे.

टिकटॉकवर केलेली जीवघेणी स्टंटबाजी भोवली; तरुणाला बेड्या
मुंबई - वांद्रे रिक्लेमेशन परिसरात मोटारसायकलस्वार हेल्मेट न घालता जीवघेणा स्टंट करून ते टिकटॉकवर अपलोड करणाऱ्या एका तरुणाला वांद्रे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. या तरुणाचं नाव अदनान शेख (२४) असं आहे.
धारावी येथे राहणाऱ्या अदनानने वांद्रे रिक्लेमेशन परिसरात हेल्मेट न घालता स्टंटबाजी करून त्याचे व्हिडीओ बनवले आणि ते व्हिडीओ टिकटॉक या सोशल मीडियावर अपलोड केले होते. हे व्हिडीओ टिकटॉकवर दिसल्यानंतर वांद्रे वाहतूक चौकीचे अंमलदार पूनमचंद पवार यांनी अदनानविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अदनानला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. अदनानचे टिकटॉकवर मोठय़ा संख्येने फॉलोवर्स आहेत. त्याचे पाहून आणखी तरुण प्रेरित होऊन अशा प्रकारे जीवघेणी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतील. त़्यामुळे ही कारवाई केल्याचे वांद्रे वाहतूक पोलिसांनी सांगितले.