"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:32 IST2025-08-20T17:31:56+5:302025-08-20T17:32:42+5:30
अनुपची पत्नी लोनी कटरा येथे राहणारी होती. तिचं २ वर्षापूर्वी अनुपसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसानंतरच अनुपने तिला मारहाण सुरू केली

"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
बाराबंकी - किरण राव यांचा लापता लेडिज हा सिनेमा पाहिला असेल, त्यात २ महिला ट्रेनमधून चुकीने एकमेकांच्या पतीसोबत जातात. पत्नींच्या अदलाबदलीचा असाच प्रकार उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे समोर आला. मात्र इथं पत्नीची अदलाबदली कुठल्याही गैरसमजातून झाली नाही. तर एका युवकाने त्याच्या पत्नीला मित्रासोबत राहण्यासाठी आणि कोर्ट मॅरेज करण्यासाठी दबाव टाकला आहे आणि हा युवक स्वत: मित्राच्या बायकोसोबत राहत आहे.
अनुप नावाचा युवक त्याच्या पत्नीला मित्र पप्पूसोबत राहण्यासाठी मजबूर करत आहे आणि तो पप्पूच्या पत्नीसोबत मागील ४ महिन्यापासून राहत आहे. पप्पूने सांगितले की, जेव्हाही मी अनुपच्या बायकोला त्याच्या घरी परत पाठवायचो, तेव्हा तो तिला मारहाण करत होता. त्यात माझी पत्नी सविताही अनुपला मदत करत होती. माझी पत्नीही माझ्यावर अनुपच्या पत्नीसोबत कोर्ट मॅरेज करण्यासाठी दबाव टाकत आहे. मी आणि अनुपची पत्नी ४ महिन्यापासून इच्छा नसतानाही एकत्र राहत आहे असं त्याने सांगितले.
२ वर्षापूर्वी झालं होते अनुपचं लग्न
अनुपची पत्नी लोनी कटरा येथे राहणारी होती. तिचं २ वर्षापूर्वी अनुपसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसानंतरच अनुपने तिला मारहाण सुरू केली. कौटुंबिक वादातून अनुप पत्नीला मारहाण करायचा आणि तिला माहेरी सोडून यायचा. त्यानंतर दीड वर्ष ती माहेरी राहिली. तिच्या माहेरच्यांनी तिला समजावून सासरी पाठवली. परंतु जेव्हापासून अनुपची पत्नी माहेरवरून सासरी परतली तेव्हापासून तो तिला पप्पूसोबत राहण्यासाठी दबाव टाकत आहे. या गोष्टीचा विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी देतो. तुझ्यासाठी माझ्या घरात काही जागा नाही. तू पप्पूसोबत पती-पत्नीसारखे राहा असं अनुप म्हणत असल्याचं त्याची पत्नी सांगते.
४ महिन्यापासून एकत्र राहतात
तर जेव्हा मी घरी नसायचो, तेव्हा अनुप माझ्या घरी येत होता. त्यातच अनुप आणि माझ्या बायकोमध्ये जवळीक वाढली. या दोघांमध्ये संबंध वाढले. अनुप कुठल्याही किंमतीत माझ्या बायकोला सोडत नव्हता. गेल्या ४ महिन्यापासून ते एकत्र राहतात. दोघांनी कोर्टात मॅरेज केले आहे. माझ्या पत्नीने मला १० हजार रुपये दिले आणि अनुपच्या पत्नीसोबत कोर्ट मॅरेज करण्यास सांगितल्याचा आरोप पप्पूने केला आहे.
दरम्यान, हे प्रकरण पोलिसांकडे पोहचले तेव्हा त्यांनी अनुप, त्याची पत्नी आणि पप्पू, सविता यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. दोन्हीही युवक ७ वर्षापासून अहमदाबाद येथे नोकरी करतात. ते दोघे राहायलाही जवळच होते. दोघे एकाच गावातील आहेत. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. पप्पूचे लग्न ७ वर्षापूर्वी झालं होते.