वरळीतील हॉटेलमध्ये गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार, सोशल मीडियावर झालेल्या ओखळीचा घेतला गैरफायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 11:50 AM2021-07-31T11:50:35+5:302021-07-31T11:51:19+5:30

Crime News:  सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणासोबत वाढदिवस साजरा करणे तरुणीला महागात पडले आहे. या तरुणीला गुंगीचे औषध देत पंचतारांकित हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

Young woman raped while giving drugs in a hotel in Worli | वरळीतील हॉटेलमध्ये गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार, सोशल मीडियावर झालेल्या ओखळीचा घेतला गैरफायदा

वरळीतील हॉटेलमध्ये गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार, सोशल मीडियावर झालेल्या ओखळीचा घेतला गैरफायदा

Next

मुंबई :  सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणासोबत वाढदिवस साजरा करणे तरुणीला महागात पडले आहे. या तरुणीला गुंगीचे औषध देत पंचतारांकित हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीच्या आरोपानुसार, आरोपीने तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावले होते. तेव्हा वरळीतील एका हॉटेलमध्ये नेऊन तिला गुंगीचे औषध घालून पेय दिले. ते प्यायल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. तेव्हा माझ्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तरुणीने केला आहे. शुद्धीवर आल्यानंतर ती रूममध्ये एकटीच होती. याची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी आधी डॉक्टरकडे जात नंतर जवळच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार केली. हा गुन्हा वरळीत घडल्यामुळे पुढील तपासासाठी तो वरळी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
 

Web Title: Young woman raped while giving drugs in a hotel in Worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app