लग्नाआधीच तरुणी बनली आई; गर्भधारणा होऊन सात महिने झाले तरी घरच्यांना पत्ता नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 14:04 IST2021-07-25T14:03:11+5:302021-07-25T14:04:41+5:30
Crime News: गावतीलच एक तरुण धीरज कुमारवर या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लग्नाआधीच तरुणी बनली आई; गर्भधारणा होऊन सात महिने झाले तरी घरच्यांना पत्ता नाही...
बिहारच्या (Bihar) समस्तीपूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एक तरुणी लग्नाआधीच आई बनली. तिने एका हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. यानंतर गावात चर्चा रंगू लागल्या. कुटुंबियांनुसार शनिवारी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे डॉक्टरांनी सांगितले की ती सात महिन्यांची गरोदर आहे. यानंतर नातेवाईकांच्या पायाखालची वाळूच सरकली. (Young women gve birth to child before marriage. )
हे प्रकरण अंगार घाट पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील आहे. गावतीलच एक तरुण धीरज कुमारवर या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तरुणी गर्भवती झाल्यानंतर त्या तरुणाने तिच्याशी संबंध तोडले आणि लग्नास नकार दिला. तसेच त्या तरुणीला ठार मारण्याची धमकी देत तिचे तोंड बंद केले. या भीतीने या तरुणीने घरातल्यांनाही काहीच सांगितले नाही. अखेर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सात महिन्यांनी या प्रकरणाची भांडेफोड झाली.
तरुणीला पोटात दुखत होते म्हणून घरातल्यांनी दलसिंहसराय हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे तिने सात महिन्यांच्या मुलाला जन्म दिला. या नवजात बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना समस्तीपूरच्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. आता या तरुणीला कधीपर्यंत न्याय मिळतो हे पहावे लागणार आहे.