young men committed suicide after girlfriend refuse to marry | अंत्यसंस्काराला गर्लफ्रेंडला बोलवा, असे सांगत त्याने केली आत्महत्या 
अंत्यसंस्काराला गर्लफ्रेंडला बोलवा, असे सांगत त्याने केली आत्महत्या 

नवी दिल्ली - खूप प्रयत्न केल्यानंतरही प्रेयसीने दिलेले दु:ख विसरणे मला शक्य होत नाही आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या अंत्यसंस्काराला माझ्या प्रेयसीला बोलवा, असे सांगत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एक चिठ्ठी लिहून आणि व्हिडिओ तयार करून आपली व्यथा मांडली आहे. तसेच आत्महत्येसाठी आपली प्रेयसी आणि दोन मित्र कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर संबंधित तरुणीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

 हरप्रित सिंह असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून.तो आपल्या कुटुंबीयांसह दिल्लीतील निहाल विहार परिसरात राहत होता. अपघातात जखमी झाल्याने तो गेले काही दिवस तो घरी आराम करत होता. दरम्यान, 12 नोव्हेंबर रोजी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या खोलीतून एक चिठ्ठी मिळाली आहे. ज्यात त्याने आपल्या मृत्यूसाठी प्रेयसी आणि दोन मित्रांना जबाबदार ठरवले आहे. मी माझ्या प्रेयसीला  7 लाख रुपये व्याजावर दिले होते. मात्र ते पैसे परत देण्यास सांगितल्यावर तिने मित्रांसोबत मिळून मला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती, अस हरप्रीतने या चिठ्ठीत म्हटले आहे. 

तपासादरम्यान, पोलिसांना मोबाइलमध्ये एक व्हिडीओ मिळाला आहे. हा व्हिडीओ हरप्रीतने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केला होता. दरम्यान, हरप्रीत याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. याबाबत हरप्रीतच्या भानाने सांगितले की,हरप्रीत हा कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीवर प्रेम करत होता. तिच्यासोबत विवाह करण्याची त्याची इच्छा होती. काही दिवसांपूर्वी आमचे नातेवाईक बोलणी करण्यासाठी या तरुणीच्या घरी गेले होते. मात्र या तरुणीने आणि तिच्या कुटुंबीयांनी विवाह करण्यास नकार दिला. 

 खूप प्रयत्न केल्यानंतरही प्रेयसीने दिलेले दु:ख विसरणे मला शक्य होत नाही आहे. तिच्या मित्रांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूची बातमी आणि माझा शेवटचा फोटो फेसबूकवर अपलोड करा. माझ्या अंत्यसंस्काराला माझ्या प्रेयसीला बोलवा, असा मेसेज हरप्रीतने आपल्या एका मित्राला पाठवला होता. 
 

Web Title: young men committed suicide after girlfriend refuse to marry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.