कुरियरद्वारे अमेरिकेत ड्रग्स पाठविणारा तरुण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 23:52 IST2019-02-21T23:51:12+5:302019-02-21T23:52:29+5:30
इरफान रिझवान खान असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो माहिम येथील रहिवासी आहे.

कुरियरद्वारे अमेरिकेत ड्रग्स पाठविणारा तरुण अटकेत
मुंबई - कुरिअरद्वारे अमेरिकेत अमली पदार्थ पाठवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) अटक केली आहे. इरफान रिझवान खान असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो माहिम येथील रहिवासी आहे.
आरोपीकडून 50 ग्रॅम डायझेपाम नावाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. अंधेरी एमआयडीसी परिसरात कुरिअरने अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी हा साठा जप्त केला. याप्रकरणी खानला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधीत पार्सल अभिजीत सरकार नावाच्या व्यक्तीच्या पॅनकार्ड व आधारकार्डच्या सहाय्याने कुरिअर करण्यात येत होते. तसेच अमेरिकेत हे पार्सल कोणाला पाठवण्यात येणार होते याचाही तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.