शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

तरुणाने मालकाकडे मागितला दोन महिन्यांचा पगार, बेदम मारहाण करून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 18:08 IST

एनईबी पोलिसांनी मेडिकल बोर्डाकडून मृत शिवचरण यांचे पोस्टमॉर्टम करून मृतदेह नातेवाईक ताब्यात दिला आहे.

ठळक मुद्देफायनान्स कंपनीचे संचालक रवी चौधरी यांच्यासह १२ लोकांविरोधात हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू केली आहे.शिवचरण अनेक वर्षांपासून रवी चौधरी यांच्यासोबत काम करत होता. बुधवारी दुपारी रवीने शिवचरणला लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर काम करण्यासाठी बोलावले.

राजस्थानमधील अलवर शहरातून हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी ट्रान्सपोर्ट नगरमध्ये फायनान्स रिकव्हरी एजंट म्हणून काम करणाऱ्या एका युवकाने कंपनीच्या मालकाला दोन महिन्यांच्या पगाराबद्दल विचारणा केली असता मारहाण केली गेली. एनईबी पोलिसांनी मेडिकल बोर्डाकडून मृत शिवचरण यांचे पोस्टमॉर्टम करून मृतदेह नातेवाईक ताब्यात दिला आहे.फायनान्स कंपनीचे संचालक रवी चौधरी यांच्यासह १२ लोकांविरोधात हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू केली आहे. शिवचरण असे मृताचे नाव सांगितले जात आहे. शिवचरणची आई राधा यांनी सांगितले की, तिचा मुलगा शिवचरण एका फायनान्स कंपनीत रिकव्हरी फायनान्स एजंट म्हणून काम करायचा. या कंपनीचे संचालक रवी चौधरी असून त्यांचे कार्यालय एनईबी पोलीस स्टेशन परिसरातील ट्रान्सपोर्ट नगर येथे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शिवचरण अनेक वर्षांपासून रवी चौधरी यांच्यासोबत काम करत होता. बुधवारी दुपारी रवीने शिवचरणला लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर काम करण्यासाठी बोलावले. कामाच्या वेळी शिवचरणने लॉकडाऊनदरम्यान 2 महिन्यांचा पगार मागितला पण रवी चौधरी यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला.

धक्कादायक! हैदराबादमध्ये रिक्षाचालकाने केला १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार 

 

५ लाखाची दारू, २ किलो गांजा जप्त, लॉकडाऊनमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई

 

Coronavirus : ना लष्कर बोलावणार, ना जीवनावश्यक वस्तूंची दुकानं बंद करणार; मुंबई पोलिसांकडून मोठा खुलासा

यानंतर पगाराची रक्कम न दिल्यास शिवचरण यांनी निषेध नोंदविला आणि पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. याचा राग पाहून रवि आणि त्याच्या 8 ते 10 लोकांनी शिवचरणला कारमध्ये पकडून टाकले आणि त्यांना वाहनांनी बंदिस्त चौकात नेले. तेथे त्यांनी शिवचरणला बेदम मारहाण केली. काल रात्री 11 वाजता ही घटना घडली. यानंतर कंपनीच्या ऑपरेटरने रात्री उशिरा कुटुंबातील सदस्यांना बोलावून शिवचरणची प्रकृती खराब असल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईक रुग्णालयात पोहोचले तोपर्यंत शिवचरण यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात रवी चौधरी यांचे इतर दोन भाऊ देवेंद्र चौधरी, मुकेश चौधरी आणि बंटी सरदार यांच्यासह अनेक लोकांचा सहभाग असल्याचा आरोप मृताच्या आई आणि कुटुंबीयांनी केला आहे.पोलीस उपअधीक्षक नरेश शर्मा म्हणाले की, राधा यांच्या तक्रारीवरून 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतकाच्या आईने देवेंद्र चौधरी, रवी चौधरी, मुकेश चौधरी, बंटी यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ते पुढे म्हणाले की, प्राथमिक तपासणी दरम्यान प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे आणि आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेडिकल बोर्डाकडून पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीMurderखून