पिस्तुल बाळगणारा तरुण गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 18:03 IST2018-09-20T18:00:19+5:302018-09-20T18:03:56+5:30
निखिल काळण (वय 19) असे या तरुणाचे नाव असून तो बदलापूर रोडवरील हेदुटने गावातील रहिवासी आहेr

पिस्तुल बाळगणारा तरुण गजाआड
डोंबिवली - बदलापूर रोडवरील खोणी नाका येथे एक व्यक्ती पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. शिंगटे यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजनान काब्दुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगटे यांच्यासह हवालदार पाटील, पोलीस नाईक कदम, कोळी, पोलीस शिपाई सोनावणे, चौधरी यांनी मंगळवारी या परिसरात सापळा रचला. या ठिकाणी एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक पिस्तुल व 2 कारतुस आढळले. निखिल काळण (वय 19) असे या तरुणाचे नाव असून तो बदलापूर रोडवरील हेदुटने गावातील रहिवासी आहे. अटक केलेल्या काळण यांने हे पिस्तुल त्याचेच असल्याची कबुली पोलिसांनी दिली.