लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 20:22 IST2019-05-08T20:20:22+5:302019-05-08T20:22:51+5:30

लग्नाचे अमिष दाखवून एका तरूणीवर अत्याचार केल्याचा प्रकार वांगणीत घडला आहे. 

young girl raped by man on pretext of marriage | लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर बलात्कार

लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर बलात्कार

बदलापूर: लग्नाचे अमिष दाखवून एका तरूणीवर अत्याचार केल्याचा प्रकार वांगणीत घडला आहे.  तसेच प्रियकराला त्याचे दुस-या तरूणीशी असलेल्या अनैतिक संबंधाचा जाब विचारल्याने रागातून प्रियकराने तरूणीला मारहाण करत तिच्या डोक्याचे केस कापून तिचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमसंबंधातून वांगणीतील अमित शेलार आणि तरूणी एकत्र राहत होते. मुंबईतील एका बारमध्ये दोघांमध्ये ओळख होऊन प्रेमसंबंध जुळले होते. त्यांनतर अमितने या तरूणीला वांगणी येथे घर घेऊन दिल्याचा दावा या तरूणीने केला आहे. त्यानंतर त्याने या तरूणीला लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तरूणीने केला आहे. त्याचवेळी अमितचे इतर तरूणीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने या तरूणीने त्याला जाब विचारला होता. मात्र, जाब विचारल्याने संतप्त झालेल्या अमितने या तरूणीला शिवीगाळ करत मारहाण केली.

याशिवाय, अमितने या तरूणीच्या डोक्यावरचे केस कापत तिचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला.  याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: young girl raped by man on pretext of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.