मोबाईल चोरीमुळे तरुणाला गमवावा लागला जीव, खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मरेपर्यंत मारहाण
By पूनम अपराज | Updated: December 28, 2020 14:34 IST2020-12-28T14:34:27+5:302020-12-28T14:34:57+5:30
Mobile Robbery And Murder : याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मोबाईल चोरीमुळे तरुणाला गमवावा लागला जीव, खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मरेपर्यंत मारहाण
मुंबई - सांताक्रूझ येथे मोबाईल चोरीच्या आरोपावरून एका तरुणाला बांधून बेदम मारहाण करून ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांताक्रूझ पश्चिमेकडील मुक्तानंद पार्कमध्ये ही खेदजनक घटना घडली. सांताक्रूझ येथील पालिकेचे हे मैदान म्हणजे गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. येथे आलेल्या सैजाद खान (३०) नावाच्या तरुणाला तिथला मुकादम आणि कामगारांनी लोखंडी खांबाला बांधलं त्यानंतर काठी आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर सैजाद विव्हळत जवळील रिक्षात जाऊन झोपला. त्यानंतर भाभा रुग्णालयात त्याला दाखल केले असते मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुक्तानंद पार्कमध्ये ही घटना घडली असून लोखंडी खांबाला बांधून काठी आणि लाथानुकक्यानी मारहाण करण्यात आली बेदम मारहाणीत सैजाद खान याचा मृत्यू झाला सांताक्रूझ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हयाची नोद केला आणि सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मोबाईल चोरीमुळे तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्यात तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ पसरली आहे. २५ डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. सैजाद भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली.
मुंबई - मोबाईल चोरीमुळे तरुणाचा झाला मृत्यू, खांबाला बांधून लाधाबुक्क्यांनी मरेपर्यंत मारहाण pic.twitter.com/AyhWIwO6rP
— Lokmat (@MiLOKMAT) December 28, 2020