शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Siddhu Moosewala : 'हो माझ्या गॅंगनेच मुसेवालाचा खून केला', तिहार तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 17:14 IST

Siddhu Moosewala : यासोबतच लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, विकी मिड्दुखेडा कॉलेजच्या काळापासून माझा मोठा भाऊ होता, आमच्या ग्रुपने त्याच्या मृत्यूचा बदला घेतला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला (Siddhu Moosewala) हत्याकांडप्रकरणी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) अखेर आपला गुन्हा कबूल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान (Police Enquiry) लॉरेन्स बिश्नोईने कबूल केले की, हो आमच्या गॅंगतील सदस्याने मूसेवालाची हत्या केली आहे. यासोबतच लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, विकी मिड्दुखेडा कॉलेजच्या काळापासून माझा मोठा भाऊ होता, आमच्या ग्रुपने त्याच्या मृत्यूचा बदला (Death revenge) घेतला आहे.

तिहार तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई म्हणाला, 'यावेळी हे काम माझे नाही कारण मी सतत तुरुंगात होतो आणि फोन वापरत नव्हतो, पण सिद्धू मुसेवालाच्या हत्येत आमच्या टोळीचा हात असल्याची मी कबुली देतो.' लॉरेन्सने कबूल केले की, पंजाबमधील एक प्रसिद्ध गायक देखील त्याचा भाऊ आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते नाव उघड करता येत नाही.दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सांगितले की, तिहार तुरुंगात टीव्ही पाहून मला सिद्धू मुसेवाला हत्याकांडाची माहिती मिळाली. लॉरेन्स बिश्नोईच्या कबुलीजबाबावरून कॅनडात बसलेल्या गोल्डी ब्रारशिवाय तुरुंगाबाहेरून आपली टोळी चालवणारा सचिन बिश्नोई याचाही सिद्धू मुसेवालाच्या हत्येत हात असल्याचे स्पष्ट झाले.मूसेवाला हत्याकांडाचे अनेक कनेक्शन समोर आले आहेतमानसा येथे पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येला ५ दिवस झाले आहेत. या हत्येत पंजाबपासून दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश... अगदी कॅनडापर्यंतचे कनेक्शन समोर आले आहे. हत्येपूर्वी आणि हत्येनंतर सिद्धूच्या घराबाहेर धावणाऱ्या वाहनांची सीसीटीव्ही फुटेजही सापडली आहेत. खुनानंतर पळून जाण्यासाठी दरोडेखोरांनी लुटलेली अल्टो कारही पोलिसांनी जप्त केली आहे. दुसरीकडे, खुद्द गुंडांनीही या हत्येत आपला हात  असल्याची कबुली सोशल मीडियावर दिली, मात्र इतके सुगावा लागूनही पोलिसांचे हात अद्याप शूटर्सपर्यंत पोहोचलेले नाहीत. सध्या पोलिस लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करत आहेत.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येत वापरण्यात आलेल्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. उत्तराखंडमधून तीन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. पोलीस या सर्वांची चौकशी करत आहेत. शिवाय, गोळीबार करणाऱ्यांच्या अनेक साथीदारांना अटकही केली, पण तपास पुढे सरकू शकला नाही. उलट आता या प्रकरणात काही नवीन नावे समोर आली आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसPunjabपंजाबjailतुरुंगdelhiदिल्ली