शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Yes Bank : कपूर दाम्पत्यावर सीबीआयचा आणखी एक गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 8:00 PM

अमृता शेरगिलच्या बंगला व्यवहारात घोटाळा

ठळक मुद्देकपूर दाम्पत्यासह त्यांचा सहाय्यक गौतम थापर याच्याविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.वाधवानने ही रक्कम गँगस्टर इकबाल मिर्ची याच्या मालमत्ता विक्रीच्या व्यवहारात वापर झाल्याचे स्पष्ट झाल्याने आठ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - हजारो कोटीचा बँक घोटाळा करुन खातेदारांना आर्थिक संकटात टाकलेल्या येस बँकेचा संस्थापक राणा कपूर, त्याची पत्नी बिंदू कपूरसह तिघाजणांविरुद्ध केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने (सीबीआय) आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. अमृता शेरगिल याच्या बंगल्याच्या व्यवहारामध्ये घोटाळा केल्याचे स्पष्ट झाल्याने कपूर दाम्पत्यासह त्यांचा सहाय्यक गौतम थापर याच्याविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, राणा कपूर गेल्या रविवारपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात असून सोमवार (दि. १६) कोठडीची मुदत आहे. रिझर्व्ह बॅँकने येस बॅँकेवर निर्बंध आणल्यानंतर ईडीने ६ मार्चला राणा कपूर याच्या वरळीतील समुद्र महल येथील फ्लॅट व कार्यालयावर छापे टाकले होते. त्याच्याकडे जवळपास ३० तासाच्या चौकशीनंतर गेल्या रविवारी पहाटे ईडीने अटक केली आहे. त्यानंतर सीबीआयनेही धाड सत्र घातले. त्यांच्या तीनही मुलींकडे कसून चौकशी सुरु असून देश सोडून न जाण्याबाबत ‘लुक आऊट’ नोटीस जारी केली आहे. सीबीआयने टाकलेल्यां छाप्यामध्ये अमृता शेरगिल यांच्या थकीत कर्जाप्रकरणी बॅँकेने त्यांचा बंगला जप्त केला होता, मात्र त्याचा रितसर लिलाव न करता तो त्यांनी स्वत: साठी खरेदी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कपूर दाम्पत्य व त्यांचा सहाय्यक गौतम थापर यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला. यापूर्वी त्याने अनिल अंबानी, दिवान हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनच्या (डीएचएफएल)प्रमुख कपिल वाधवान, यांना बेकायदेशीरपणे कर्ज दिले. वाधवानने ही रक्कम गँगस्टर इकबाल मिर्ची याच्या मालमत्ता विक्रीच्या व्यवहारात वापर झाल्याचे स्पष्ट झाल्याने आठ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Yes Bankयेस बँकCBIगुन्हा अन्वेषण विभागMumbaiमुंबई