शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

Yes Bank : सीबीआयने राणा कपूर यांच्या संबंधित 'या' सात ठिकाणी केली छापेमारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 16:43 IST

Yes Bank : सोमवारी मुंबईत सात ठिकाणी छापा टाकला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देएप्रिल ते जून, २०१८ या कालावधीत Yes Bank ने डीएचएफएलच्या अल्पावधी डिबेंचरमध्ये ३७०० कोटींची गुंतवणूक केली.या प्रकरणात सीबीआय वित्त मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि अन्य सरकारी एजन्सींच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई - Yes Bankचे संस्थापक राणा कपूर आणि इतरांवर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी मुंबईत सात ठिकाणी छापा टाकला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणा कपूर, डीएचएफएल, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स आणि मुंबईतील डोइट अर्बन व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या डीएचएफएल वांद्रे कार्यालयाशी संबंधित असलेल्या जागांवर छापे टाकले जात आहेत. सीबीआयने ७ मार्च २०२० रोजी राणा कपूर आणि डोइट अर्बन व्हेंचर्स (राणा कपूर कुटुंबाशी संबंधित कंपनी), डीएचएफएल, Yes Bank चे सीईओ, कपिल वाधवन (डीएचएफएलचा प्रवर्तक) आणि इतरांवर भा. दं. वि. कलम  १२० (बी), ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १२ आणि १३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने (१) नवी दिल्ली येथे एफआयआर दाखल केला आहे.सीबीआयच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, "राणा कपूर यांनी कपिल वाधवन आणि इतरांसमवेत Yes Bank लिमिटेडद्वारे डीएचएफएलला आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने स्वत: ला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्यामार्फत असलेल्या कंपन्यांमार्फत अवास्तव फायदा करून घेण्याचा कट रचला.""एप्रिल ते जून, २०१८ या कालावधीत Yes Bank ने डीएचएफएलच्या अल्पावधी डिबेंचरमध्ये ३७०० कोटींची गुंतवणूक केली. त्याचबरोबर कपिल वाधवन यांनी राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबियांना ६०० कोटी दिले. हे ६०० कोटी डीएचएफएलकडून डॉइट अर्बन व्हेंचर प्रा. लि.ला (ए राणा कपूर ग्रुप कंपनी) कर्ज स्वरूपात दिल्याचे दाखवले, असे एफआयआरमध्ये नमूद आहे. ईडीने या प्रकरणातील संशयितांची जबाब नोंदविण्याबाबत शक्यता वर्तवली आहे. या ठिकाणी पूर्वी ईडीने छापे टाकले होते. ईडीने सीबीआयच्या एफआयआरची दखल घेतली आणि येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याविरूद्ध मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सीबीआय वित्त मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि अन्य सरकारी एजन्सींच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. रविवारी सकाळी ३ वाजताच्या सुमारास मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीखाली अटक करण्यात आलेल्या राणा कपूर यांना ११ मार्चपर्यंत ईडीच्या ताब्यात पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Yes Bankयेस बँकCBIगुन्हा अन्वेषण विभागMumbaiमुंबई