बिष्णोई गँगच्या किलरमुळे यवतमाळवर लक्ष; आयबी, एटीएसचा आता फोकस; फाेलपणा उघड

By सुरेंद्र राऊत | Updated: June 2, 2025 12:03 IST2025-06-02T12:00:35+5:302025-06-02T12:03:10+5:30

विदेशातून येत हाेता पैसा

Yavatmal under spotlight due to Bishnoi gang killer; IB, ATS now focus; Fraud exposed | बिष्णोई गँगच्या किलरमुळे यवतमाळवर लक्ष; आयबी, एटीएसचा आता फोकस; फाेलपणा उघड

बिष्णोई गँगच्या किलरमुळे यवतमाळवर लक्ष; आयबी, एटीएसचा आता फोकस; फाेलपणा उघड

सुरेंद्र राऊत, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टाेळीचा सदस्य यवतमाळ शहरात दडून असू शकताे, यावर काेणाचाच विश्वास नव्हता. उच्चस्तरीय तपास यंत्रणांनीसुद्धा याकडे दुर्लक्ष केले. यवतमाळ एलसीबीने थेट बिष्णाेई व गुज्जर गँगसाठी काम करणारा काॅन्ट्रॅक्ट किलर जेरबंद केल्यानंतर आयबी व एटीएसने आता यवतमाळवर लक्ष केंद्रित केले आहे. हे उच्चस्तरीय तपास यंत्रणाचे माेठे अपशय मानले जात आहे. देशपातळवीर दशहत निर्माण करणाऱ्या लाॅरेन्स बिष्णाेई व बिल्लू गुज्जर गँगसाठी भूपेंद्रसिंग ऊर्फ भिंडा जरनैल सिंग (३५, रा. हाेशियारपूर पंजाब) हा काम करीत हाेता.

गँगसोबत कसा जुळला?

गँगसाेबत जुळण्यापूर्वी भिंडावर शरीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत. यातीलच गुन्ह्यात ताे कपूरतला माॅर्डन सेंट्रल जेल येथे असताना, लाॅरेन्स बिष्णाेई याच्या संपर्कात आला. नंतर ताे पुढे बिल्लू गुज्जर याच्या गँगसाेबत काम करू लागला. शेवटचा खून बाडमेर राजस्थान येथे केल्यानंतर भिंडा भूमिगत झाला. त्यानंतर उच्चस्तरीय तपास यंत्रणांकडून त्याचा शाेध घेण्याचे काम थांबविण्यात 
आले होते.

विदेशातून येत हाेता पैसा

भिंडाने २०२२ मध्ये राजस्थानमध्ये लग्न करून पत्नीच्या नावे बँक खाते उघडले. या खात्यात कॅलिफाेर्नियातून पैसे येत हाेते. नंतर पत्नी यवतमाळात वास्तव्य करत हाेती. तिच्या खात्यात दरमहा विदेशातून पैसा येताे, हे यंत्रणेला हेरता आले नाही. भिंडाला कॅलिफाेर्नियातूनच व्हर्च्युअल सीम मिळाले. त्याद्वारे ताे साेशल मीडिया वापरायचा व गाेल्डी ब्रार, साैरभ गुज्जर यांच्या संपर्कात असल्याचे त्याने सांगितले. अनेकदा त्याने व्हिडीओ काॅलचा वापर केल्याचेही पुढे आले आहे.

Web Title: Yavatmal under spotlight due to Bishnoi gang killer; IB, ATS now focus; Fraud exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.