वाशिममध्ये ३ लाख रूपये किंमतीचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 15:01 IST2018-08-03T14:58:44+5:302018-08-03T15:01:09+5:30
वाशिम : अहमदाबादहून नांदेडकडे माल घेऊन जाणाºया एका ट्रकमध्ये (एम.एच. १८ के ५०६७) अंदाजे ३ लाख रूपये किंमतीचा गुटखा, गुटखा बनविण्याचा कच्चा माल व ईतर प्रतिबंधक साहित्य शहर पोलीस स्टेशनमधील ‘शोध’ पथकाच्या तपासात हाती लागले.

वाशिममध्ये ३ लाख रूपये किंमतीचा गुटखा पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अहमदाबादहून नांदेडकडे माल घेऊन जाणाºया एका ट्रकमध्ये (एम.एच. १८ के ५०६७) अंदाजे ३ लाख रूपये किंमतीचा गुटखा, गुटखा बनविण्याचा कच्चा माल व ईतर प्रतिबंधक साहित्य शहर पोलीस स्टेशनमधील ‘शोध’ पथकाच्या तपासात हाती लागले. पोलीसांनी ३ लाख रूपयाच्या गुटख्यासह १० लाख रूपये किंमतीचा ट्रक जप्त केला. ही कारवाई ३ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजताचे सुमारास करण्यात आली.
वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी यांना नांदेडकडे जाणाºया एका ट्रकमध्ये गुटखा व गुटखा बनविण्याचा कच्चा माल असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर शोध पथकाचे प्रमुख अमित जाधव, प्रशांत अंभोरे, ज्ञानदेव म्हात्रे व गणेश बर्गे यांचा समावेश असलेल्या पथकाने मालेगाव मार्गावर ट्रक थांबविला. संशयीत ट्रक वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये उभा करून त्यामधील मालाची तपासणी केली. यामध्ये गुटख्याचे दोन पोते, गुटखा बनविण्याचा कच्चा माल व ईतर प्रतिबंधक साहित्य आढळून आले. या सर्व साहित्याची अंदाजे किंमत ३ लाख रूपये एवढी असून जप्त केलेल्य ट्रकची किंमत १० लाख रूपये. असा एकुण १३ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी शहर पोलीसांनी ट्रकचालक मो.रसूल मो. अब्बास (वय ४७, रा. धुळे ) याला ताब्यात घेतले आहे. यापुढील कारवाई करण्यासाठी अकोला येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांना दुरध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे.