विश्वकप क्रिकेट सट्टा प्रकरण : व्यवसायिकासह एकास अंबोली पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 16:35 IST2019-07-03T16:33:53+5:302019-07-03T16:35:03+5:30
काल रात्री ९.२५ ते ११. ४० वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

विश्वकप क्रिकेट सट्टा प्रकरण : व्यवसायिकासह एकास अंबोली पोलिसांनी केली अटक
मुंबई - अंधेरी पश्चिमेकडील जेपी रोडवरील मेट्रोपोलिस सोसायटीत अंबोली पोलिसांनी धाड टाकत सट्टा प्रकरणी दोघांना अटक केली आहे. चांदकिशोर खन्ना उर्फ मामाजी (५८) आणि रुचित अश्विन अरोरा (४३) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. काल रात्री ९.२५ ते ११. ४० वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
मेट्रोपोलिस सोसायटीत आरोपी चांदकिशोर खन्ना हा राहतो. तो बेटिंग क्षेत्रातील बडा व्यावसायिक असून दुसरा आरोपी रुचित हा पंजाब येथे राहतो. या दोघांनी भारत विरुद्ध बांगलादेश या विश्वकप क्रिकेट सामन्यादरम्यान मोबाईलवरून सट्टा लावला होता. याबाबत पोलिसांना विश्वासू सूत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकत दोन आरोपींना अटक केली. या दोघांकडे ४ मोबाईल, ४ वह्या/ डायऱ्या, ८ एटीएम कार्ड्स, ६ सिम कार्ड्स, २ पेन्स आणि १७६०० इतकी रक्कम पोलिसांना आढळून आली. अंबोली पोलिसांनी या वस्तू हस्तगत केल्या असून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई - विश्वकप क्रिकेट सट्टा प्रकरण : व्यवसायिकासह एकास अंबोली पोलिसांनी केली अटक https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 3, 2019