शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

मपोसे अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यांकन आठवड्याभरात करा; महासंचालकांची घटकप्रमुखांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 8:20 PM

आॅनलाईन माहिती द्यावी लागणार

ठळक मुद्देया अधिकाऱ्यांच्या गत आर्थिक वर्षाच्या कामाचा आढावा त्यांनी १५ एप्रिलपर्यंत आॅनलाईन पद्धतीने लिहावयाचे आहेत.‘मपोसे’असलेल्या उपायुक्त/ अप्पर अधीक्षक/ सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक यांच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कामाचे मुल्यांकन अद्याप घटकप्रमुखांकडून करण्यात आलेले नाही.

मुंबई - पोलीस घटक प्रमुख व प्रभारी अधिकारी आणि अंमलदार यांच्यातील समन्वयक म्हणून भूमिका बजावित असलेल्या राज्य पोलीस सेवेतील (मपोसे) उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व उपअधीक्षक यांच्या वार्षिक कार्याचे मुल्यांकन करण्यासाठी राज्यातील सर्व घटक प्रमुखांना आठवड्याभराची मुदत देण्यात आलेली आहे. या अधिकाऱ्यांच्या गत आर्थिक वर्षाच्या कामाचा आढावा त्यांनी १५ एप्रिलपर्यंत आॅनलाईन पद्धतीने लिहावयाचे आहेत.पोलिसांना कौशल्यपूर्ण व साहसी कर्तृत्वपूर्ण कामगिरीबद्दल सरकारकडून देण्यात येणाऱ्या शौर्यपदक, सन्मानचिन्ह दिली जातात. त्यासाठी त्यांचे वार्षिक गोपनिय अहवाल (एसीआर) व बक्षीसे महत्वाची असतात. त्यामुळे बढती, बदलीबरोबरच या पुरस्कारासाठी त्यांचा ‘एसीआर’ अत्यंत महत्वाचा असतो. राज्य सरकारने अधिकाऱ्यापासून कारकूनापर्यंत सर्वांचे गोपनीय अहवाल आॅनलाईन पद्धतीने लिहिण्याचा नियम गेल्या वर्षापासून लागू केला आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, अंमलदारांची कामाच्या अहवालाची पूर्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधितांची वार्षिक वेतनवाढ न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.‘मपोसे’असलेल्या उपायुक्त/ अप्पर अधीक्षक/ सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक यांच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कामाचे मुल्यांकन अद्याप घटकप्रमुखांकडून करण्यात आलेले नाही. त्यासाठी पोलीस महासंचालकांनी सर्व घटकप्रमुखांना १५ एप्रिलपर्यत मुदत दिली आहे. या कालावधीत विहित नमून्यात त्याची पूर्तता करावयाची आहे. त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी सदर नमून्यातील माहिती अचूकपणे भरल्याची खातरजमा करुन मुख्यालयाचे उपायुक्त/ अधीक्षकांकडून प्रमाणित करुन घेवून मुख्यालयात पाठवावयाची आहे. मात्र जे अधिकारी ३० जूनपर्यंत सेवानिवृत्त होणार असतील त्यांची माहिती आॅनलाईन प्रक्रियेतून वगळावयाची आहे. त्यासंबंधी मुख्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क साधावयाचा आहे.

 

 

 

 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र