शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

ठाण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 21:49 IST

ठाणे - 4 ऑगस्ट 2018 भररस्त्यात कॉलेज तरुणी प्राची धाडे हिच्यावर एकतर्फी चाकू हल्ला झाला आणि यात तिचा जीव गेला. या घटनेने ...

ठाणे - 4 ऑगस्ट 2018 भररस्त्यात कॉलेज तरुणी प्राची धाडे हिच्यावर एकतर्फी चाकू हल्ला झाला आणि यात तिचा जीव गेला. या घटनेने ठाण्यात खळबळ माजली होती. 17 सप्टेंबरला मुंब्य्रात तरुणीवर एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झाला. त्यानंतर अवघ्या 20 दिवसांनंतर 11 नोव्हेंबरला पुन्हा पालिकेच्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रात याच कारणाने बबिता दुबे नावाच्या महिलेवर चाकूने वार झाले. एकतर्फी प्रेमातून एकामागून एक घटना घडत असताना शहरात रोज कुठे ना कुठे तरुणी, महिलाबलात्कार, विनयभंग, छेडछाडीला सामोऱ्या जात होत्या. ठाणे पालीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या 11 महिन्यांत दाखल झालेल्या रेकॉर्डनुसार दिवसाला सरासरी 4 बलात्कार, 8 विनयभंग तर दर दोन दिवसांतून एक छेडछाडीचे गुन्हे ठाण्यात घडत आहेत. त्यामुळे ठाणे खरोखरच महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयात दाखल गुह्यांनुसार ठाणे, वागळे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीत 334 दिवसांत 1 हजार 136 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तर 2 हजार 739 गुन्हे विनयभंगाचे दाखल झाले असून रोडरोमिओंच्या छेडछाडीला 180 जणींना सामोरे जावे लागले आहे. या गुह्यांची सरासरी काढली तर दिवसाला 4 बलात्कार, 8 विनयभंग तर दर दोन दिवसांतून एक छेडछाडीचे गुन्हे ठाण्यात घडत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिसRapeबलात्कारMolestationविनयभंग