मुलानं आईला प्रियकरासोबत पाहिलं, आईनं प्रियकराच्या मदतीनं चक्क मुलाला संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 15:29 IST2021-08-13T15:28:01+5:302021-08-13T15:29:07+5:30
मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील एका हत्याकांडानं मायलेकाच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे.

मुलानं आईला प्रियकरासोबत पाहिलं, आईनं प्रियकराच्या मदतीनं चक्क मुलाला संपवलं!
मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील एका हत्याकांडानं मायलेकाच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे. एका अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या आईला अटक केली आहे. समनापूर ठाणे हद्दीतील एका गावात २ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली होती. सोनू नावाच्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू प्रकृती अस्वस्थामुळे झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता.
सोनूच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. पण सोनूच्या आजोबांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठलं. सोनूची हत्याचा झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. यात त्यांनी सोनूच्या आईवर संशय व्यक्त केला.
पोलिसांनी कोर्टाची परवानगी घेऊन अल्पवयीन मुलाचा जमीनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि त्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं. यात सोनूचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची हत्या करण्यात आल्याचं सिद्ध झालं. सोनूच्या डोक्यावर एक मोठा घाव दिसून आला.
आईनं दिली हत्येची कबुली
पोस्टमार्टम रिपोर्टनंतर पोलिसांनी प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली. यात मृत्यू झालेल्या सोनूच्या आईची चौकशी केली आणि सारं रहस्य उलगडला. पोलिसांनी आरोपी आईच्या प्रियकरालाही अटक केली. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही हत्येची कबुली दिली. मुलानं प्रियकरासोबत आपत्तीजनक परिस्थितीत पाहिल्यानं आई आणि प्रियकरानं मिळून मुलाची हत्या करण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या डोक्यावर दोघांनीही लाकडाच्या ओंडक्यानं जोरदार हल्ला केला आणि यातच मुलाचा मृत्यू झाला. दोघांनी मिळून मुलगा सोनू याचा मृतदेह जमिनीत गाडला होता.