शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

फेसबूकवरील मैत्री पोलिसाला पडली महागात, लंडनमधील महिलेने घातला लाखोंचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 13:45 IST

फेसबूकवरून मैत्री करून गंडा घालण्याचे प्रकार नित्याचेच झाले असताना आता चक्क एका पोलिसालाच एका महिलेने फेसबूकवर मैत्री करून लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे

ठळक मुद्देसोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबरच त्याद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाणही वाढू लागले आहे.फेसबूकवरून मैत्री करून गंडा घालण्याचे प्रकार नित्याचेच झाले असताना आता चक्क एका पोलिसालाच एका महिलेने फेसबूकवर मैत्री करून लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहेअमित कुमार असे फसवणूक झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नियुक्तीवर आहेत

फरीदाबाद - सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबरच त्याद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाणही वाढू लागले आहे. फेसबूकवरून मैत्री करून गंडा घालण्याचे प्रकार नित्याचेच झाले असताना आता चक्क एका पोलिसालाच एका महिलेने फेसबूकवर मैत्री करून लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. लंडनमध्ये राहत असल्याचा दावा करणाऱ्या या महिलेने सुरुवातील फेसबूकवरून पोलिसाशी मैत्री केली. त्यानंतर मैत्री आणि विविध अडचणींचा पाढा वाचत त्याच्याकडून तीन लाख रुपये उकळले. मात्र या महिलेचा फोन अचानक बंद झाल्याने फसवणूक झाल्याचा संशय आल्यानंतर संबंधित पोलिसाने या महिलेविरोधात  गुन्हा दाखल केला आहे.  अमित कुमार असे फसवणूक झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नियुक्तीवर आहेत. गतवर्षी जानेवारी महिन्यात माझी फेसबूकवरून लंडनमधील शैली ब्राऊन नावाच्या महिलेशी मैत्री झाली होती. मी मेसेंजरवरून तिच्याशी सातत्याने चॅटिंग करत असत. त्यानंतर काही काळाने शैलीने माझा व्हॉट्सअॅप नंबर मिळवला. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी आपण भारतात येत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर प्रिया चंगोली नावाच्या एका महिलेने मला फोन करून शैली भारतात पोहोचल्याचे सांगितले. तिने आपल्यासोबत दीड लाख पौड्सचा ड्राफ्ट आणला असून, ती रक्कम भारतीय चलनामध्ये परिवर्तित करून घेण्यासाठी काही रुपयांची गरज असल्याचे सांगत पैशांची मागणी केली. त्यानंतर मी 35 हजार रुपये तिने सांगिललेल्या खात्यात जमा केले, असे अमित कुमार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर या ड्राफ्टच्या मोबदल्यात आरबीआयकडून खात्यात एक कोटी 35 लाख 95 हजार 800 रुपये जमा होतील असे प्रिया नामक महिलेने त्यांना सांगितले. तसेच या रकमेचे आमिष दाखवून विविध खात्यांमध्ये त्यांच्याकडून तीन लाख रुपये जमा करून घेतले. त्यानंतर आरोपी सातत्याने पैसे पाठवण्यासाठी तगादा लावू लागले. मात्र आता अमित यांना त्यांच्यावर संशय आला. तसेच त्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मात्र या सर्व आरोपींचे फोन बंद झाले. अखेरीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमित यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान,  पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतरी तिची छाननी केली असून, तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपासास सुरुवात केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमFacebookफेसबुक