शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

केडीएमसीत महिला उपमहापौरास शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 9:13 PM

धमकी देण्याऱ्या उमेश साळुंखे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देअनधिकृत बांधकामप्रकरणी उपमहापौर लक्षवेधी मांडणार होत्या. उपमहापौर यांनी बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली. बांधकाम उमेश साळुंखे या व्यक्तीने केले आहे.

कल्याण - केडीएमसी मुख्यालयात उपमहापौरास शिवीगाळ आणि जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामप्रकरणी उपमहापौर लक्षवेधी मांडणार होत्या. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या उपमहापौर कार्यालयात येवून उपमहापौर यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्याऱ्या उमेश साळुंखे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे साळुंखे याने रहदारीच्या रस्त्यावर अनधिकृतपणे बांधकाम केल्यानंतर महापालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने उपमहापौर गुरुवारच्या महासभेत लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती मिळताच साळुंखे याने हा प्रकार केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या टिटवाळा-मांडा या भागात रस्त्यावर काही बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामांविरोधात स्थानिक नागरिकांनी उपमहापौर यांच्याकडे तक्रार केली होती. बांधकाम उमेश साळुंखे या व्यक्तीने केले आहे. उपमहापौर यांनी बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, पालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. अखेर गुरुवारच्या महासभेत यांनी या विषयावर महासभेत लक्षवेधी मांडण्याचा निर्णय घेतला. याची माहिती उमेश साळुंखेला मिळाली. उपमहापौर यांचा आरोप आहे की,साळुंखे त्यांच्या दालनात आला. त्याने चार ते पाच जणांच्या समोर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर सुरक्षारक्षकालासुद्धा दम दिला. त्यानंतर उपमहापौर यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या संदर्भात उमेश साळुंखे याचे म्हणणे आहे की,त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्याने आपल्या जागेवरच बांधकाम केले आहे. गुरुवारी जो काही प्रकार झाला त्यावेळी महापालिका अधिकारी सुद्धा उपस्थित होते. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी उमेश साळुंखेविरोधात  गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. 

टॅग्स :ArrestअटकMuncipal Corporationनगर पालिकाkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाPoliceपोलिस