'मला जगायचं आहे...', हातावर सुसाइड नोट लिहून महिलेने मृत्यूला कवटाळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 15:53 IST2023-01-26T15:50:34+5:302023-01-26T15:53:05+5:30
Gujarat : सूरतच्या लिंबायत भागात महिलेने तिच्याच घरात स्वत: ला गळफास लावून घेत आत्महत्या केली. महिला तिच्या पतीला फार वैतागली होती.

'मला जगायचं आहे...', हातावर सुसाइड नोट लिहून महिलेने मृत्यूला कवटाळलं
Gujarat : गुजरातच्या सूरतमध्ये महिलेच्या आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने आत्महत्येआधी तिच्या हातावरच सुसाइड नोट लिहिली होती. जी बघून लोक हैराण झाले. महिलेने तिच्या हातावर आत्महत्येचं जे कारण लिहिलं ते हैराण करणारं आहे.
सूरतच्या लिंबायत भागात महिलेने तिच्याच घरात स्वत: ला गळफास लावून घेत आत्महत्या केली. महिला तिच्या पतीला फार वैतागली होती. मरण्याआधी महिलेने हिंदी तिच्या हातावर लिहिलं की, 'मला जगायचं आहे, पण माझा पती मला खूप त्रास देत आहे'.
असं सांगितलं जात आहे की, आत्महत्या करणाऱ्या महिलेचा पती ऑटो चालवतो. झारखंडची राहणारी ही महिला सूरतच्या लिंबायतमध्ये पती प्रवीण गोस्वामीसोबत राहत होती. मृत महिलेला दोन मुलं आहेत. 8 वर्षाआधी तिचं लग्न झालं होतं.
शेजारी लोकांनी जेव्हा महिलेला गळफास घेतलेलं पाहिलं तेव्हा त्यांनी 108 नंबरवर फोन करून अॅम्बुलन्स बोलवली आणि लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी महिलेच्या आत्महत्येची नोंद करून चौकशी सुरू केली आहे.
या घटनेच्या काही दिवसांआधीच एक अशीच घटना हरयाणाच्या गुरुग्राममधून समोर आली होती. इथे एका 25 वर्षीय नवविवाहितेने हातावर सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली होती. या आत्महत्येसाठी तिने तिच्या सासरच्या लोकांना दोष दिला होता. सुसाइड नोटमध्ये तिने तिची शेवटची इच्छा लिहिली होती की, माझ्या सासरच्या लोकांना माझा चेहराही दाखवू नका.