बुलडाण्यातील महिलेस मध्यप्रदेशात नेऊन विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:05 IST2021-02-11T12:01:32+5:302021-02-11T12:05:35+5:30

Crime News मध्य प्रदेशात उज्जैनलगतच्या परिसात नेऊन तिची विक्री करत एकाशी लग्न लावून दिल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.  

The women from Buldana were taken to Madhya Pradesh and sold | बुलडाण्यातील महिलेस मध्यप्रदेशात नेऊन विकले

बुलडाण्यातील महिलेस मध्यप्रदेशात नेऊन विकले

ठळक मुद्देमहिलेबाबत हा प्रकार ऑक्टोबर २०२० दरम्यान घडला होता.महिलेने बुलडाण्यात संपर्क साधल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: देव दर्शनाला नेण्याच्या बहाण्याने एका ३४ वर्षीय महिलेस मध्य प्रदेशात उज्जैनलगतच्या परिसात नेऊन तिची विक्री करत एकाशी लग्न लावून दिल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.  पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात बुलडाणा येथील केदार राजोरिया यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सबंधीत महिलेबाबत हा प्रकार ऑक्टोबर २०२० दरम्यान घडला होता. पीडित महिलेने याप्रकरणी बुलडाण्यात संपर्क साधल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. 
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेला आणण्यासाठी पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशमध्ये रवाना झाल्याची माहिती पोलीस अधिकारी सुधाकर गवारगुरू यांनी दिली. 
पीडित महिलेचा मुलगा हा स्थानिक विष्णूवाडीमध्ये एका ठिकाणी काम करतो. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने त्या मुलाच्या वतीने तो जेथे काम करतो त्याच्या मालकाने पोलिसात ही तक्रार दिली आहे.या प्रकरणी पुढील तपास बुलडाणा पाेलीस करीत आहेत. 

Web Title: The women from Buldana were taken to Madhya Pradesh and sold