तिहेरी हत्याकांडानं बीड हादरलं; महिलेसह दोन मुलांची निर्घृण हत्या, पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 23:23 IST2020-05-24T16:30:59+5:302020-05-24T23:23:01+5:30

महिलेच्या हत्येप्रकरणी पतीला अटक; पोलिसांकडून तपास सुरू

women and 2 children killed brutally in beed husband arrested kkg | तिहेरी हत्याकांडानं बीड हादरलं; महिलेसह दोन मुलांची निर्घृण हत्या, पतीला अटक

तिहेरी हत्याकांडानं बीड हादरलं; महिलेसह दोन मुलांची निर्घृण हत्या, पतीला अटक

बीड : शहरातील पेठ बीड भागात एका महिलेसह दोन मुलांची क्रूर हत्या करण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी समोर आला. महिलेच्या व एका मुलाच्या डोक्यात दगड अथवा इतर शस्त्राने वार केला गेला आहे. तर एका मुलाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले गेले आहे. तिहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, या महिलेच्या पतीला पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो स्वत:च पेठ बीड पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन आला होता. मृत महिलेचे नाव संगिता संतोष कोकणे असून तिचे अंदाजे वय ३० वर्षे आहे. तर कल्पेश (वय ६ वर्षे) व सिद्धेश (वय ९ वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व इतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
 

Web Title: women and 2 children killed brutally in beed husband arrested kkg

टॅग्स :Murderखून