महिलेची आत्महत्या, पतीविरोधात गुन्हा; पतीच्या प्रेमसंबंधांना केला होता विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 14:36 IST2023-05-14T14:36:10+5:302023-05-14T14:36:32+5:30

महिलेला सोडू शकत नाही, तुला काय करायचे ते कर, असे बोलून तो तिच्यासोबत भांडण उकरून काढत होता. संबंधित महिलाही प्रज्ञाशी चुकीच्या भाषेत बोलून तिला मेसेज पाठवित होती. त्यामुळे प्रज्ञा मानसिक छळाला कंटाळली होती. 

Woman's suicide, crime against husband; The husband's love affairs were opposed | महिलेची आत्महत्या, पतीविरोधात गुन्हा; पतीच्या प्रेमसंबंधांना केला होता विरोध

महिलेची आत्महत्या, पतीविरोधात गुन्हा; पतीच्या प्रेमसंबंधांना केला होता विरोध

कल्याण : बदलापूर येथे राहणाऱ्या इंजिनीअर महिलेने विष पिऊन आत्महत्या केल्याप्रकरणी महिलेचा पती आणि प्रेयसीविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी, प्रज्ञा सचिन मोरे (वय ४४, रा.बदलापूर) ही महिला इंजिनीअर होती. तिचा पती सचिन मोरे याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध हाेते, याची माहिती प्रज्ञा हिला होती. प्रज्ञा हिचा पतीच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. पतीने महिलेशी संबंध ठेवणार नाही, असे प्रज्ञाला सांगितले होते. मात्र, पती पुन्हा त्या महिलेच्या संपर्कात होता. 

महिलेला सोडू शकत नाही, तुला काय करायचे ते कर, असे बोलून तो तिच्यासोबत भांडण उकरून काढत होता. संबंधित महिलाही प्रज्ञाशी चुकीच्या भाषेत बोलून तिला मेसेज पाठवित होती. त्यामुळे प्रज्ञा मानसिक छळाला कंटाळली होती. 

प्रज्ञा ही १३ एप्रिलला बदलापूरहून कामावर जाण्यासाठी निघाली. ती कल्याणला आंबेडकर रोडवर आली असता, तिने विष प्राशन केले. भर रस्त्यात ती कोसळली. तिला नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन  दिवसांनी तिच्या मृत्यू झाला. पती आणि त्याच्या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आईने विष प्राशन केले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला, अशी तक्रार तिची मुलगी रिद्धी हिने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Woman's suicide, crime against husband; The husband's love affairs were opposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.