शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

म्हैस चारण्यास गेलेल्या महिलेची गळा चिरून हत्या; पाय छाटून चोरट्यांनी लंपास केले पैंजण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 20:09 IST

Murder Case : जयपूर ग्रामीणचे एसपी शंकर दत्त शर्मा यांनी सांगितले की, ती महिला म्हैस चरायला गेली असताना अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी महिलेचे पाय कापून तिच्या पायातील चांदीची पैंजण चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूर येथील खाटेपुरा येथे अज्ञात हल्लेखोरांनी एका महिलेचा गळा चिरून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी महिलेच्या हत्येनंतर ग्रामस्थांनी धरणे धरत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.३० पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेतजयपूर ग्रामीणचे एसपी शंकर दत्त शर्मा यांनी सांगितले की, ती महिला म्हैस चरायला गेली असताना अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी महिलेचे पाय कापून तिच्या पायातील चांदीची पैंजण चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्राथमिक तपासात ही चोरीची घटना असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांची ३० पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.संतप्त ग्रामस्थ आरोपींना तात्काळ अटक करा, नुकसान भरपाई आणि कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्या अशी मागणी करत आहेत. गीता देवी नावाच्या महिलेचे वय ५५ वर्षे होते. गावकरी तेथून मृतदेह नेऊ देत नाहीत. आम्ही ग्रामस्थ आणि कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.महिलांवरील गुन्ह्यात राजस्थान अव्वल : भाजपदरम्यान, भाजपचे राज्यसभा सदस्य किरोडीलाल मीणा यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उद्देशून त्यांनी ट्विट केले की, 'तुम्हा महिलांना उत्तर प्रदेशमध्येच असुरक्षित वाटत आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थान देशात अव्वल असल्याची लाजिरवाणी वस्तुस्थिती आहे. महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून राज्याचे प्रमुख केवळ त्यांच्याच कामकाजात व्यस्त असल्याचा आरोप मीना यांनी केला.त्याचवेळी भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी राजस्थानमध्ये अशा घटना सर्रास घडल्या असून त्या मीडियात येऊ नयेत म्हणून लपवल्या जात असल्याचं म्हटलं आहे. गुन्हेगारांचा वावर एवढा वाढला आहे की पोलिसांचा धाक उरलेला नाही. ते केवळ मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. काँग्रेस सरकार स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थानDeathमृत्यूRobberyचोरी