खतरनाक! गुप्तांगात लपवून महिला तुरूंगात घेऊन गेली गन, सापडली तेव्हा सर्वांना बसला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 04:02 PM2021-05-03T16:02:01+5:302021-05-03T16:19:03+5:30

Missouri इथे राहणाऱ्या एका महिलेने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बंदूक लपवली. इतकंच नाही तर ही बंदूक ती तुरूंगात घेऊन गेली.

Woman who smuggled gun in her vagina sentence for 10 year | खतरनाक! गुप्तांगात लपवून महिला तुरूंगात घेऊन गेली गन, सापडली तेव्हा सर्वांना बसला धक्का!

खतरनाक! गुप्तांगात लपवून महिला तुरूंगात घेऊन गेली गन, सापडली तेव्हा सर्वांना बसला धक्का!

Next

अमेरिकेतील एका महिलेने असा कारनामा केलाय ज्याबाबत ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. सोबतच लोकांना प्रश्नही पडला आहे की, असं कसं होऊ शकतं. Missouri इथे राहणाऱ्या एका महिलेने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गन लपवली होती. इतकंच नाही तर ही गन ती तुरूंगात घेऊन गेली. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तर सर्वांनाच धक्का बसला. 

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, या महिलेचं नाव Amy Wilhite असं आहे. ही महिला ३९ वर्षांची असून तिला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ती Boone County तुरूंगात तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गन घेऊन गेल्या प्रकरणात ती दोषी आढळून आली. ही घटना व्हॅलेंटाईन डे च्या दिवसाची आहे. 

जेव्हा या महिलेकडे गन आढळून आली तेव्हा त्यात पाच राउंडही शिल्लक होते. जेव्हा ती तुरूंगात आली तेव्हा पोलीस आणि तुरूंगाचे गार्ड ही गन डिटेक्ट करू शकले नाही. अथॉरिटीला ही गन तिला तुरूंगात पाठवल्यावर १७ दिवसांनी सापडली. त्याआधी तिला ड्रग्सप्रकरणी तुरूंगात पाठवलं होतं.  (हे पण वाचा : 'या' जपानच्या डॉन जुआनने केला होता ४ हजार महिलांसोबत संबंध ठेवल्याचा दावा, 'शेवटच्या' पत्नीने विष देऊन संपवलं)

Wilhite ने हे कबूल केलं आहे की, जेव्हा तिची चौकशी केली जात होती. तेव्हाही तिने गन तुरूंगात नेण्यासाठी लपवली होती. मात्र, तुरूंगात तिच्यासोबत जे इतर लोक आहेत ते या गोष्टीबाबत सहमत नाहीत. तुरूंगात नेण्याआधी कैद्याची पूर्ण चेकिंग होते. त्यांची पूर्ण कपडे काढून झडती घेतली जाते. एखादी वस्तू कुठे लपवली नसेल याची शहानिशा केली जाते. तरी ही घटना कशी घडली ही विचार करण्याची बाब आहे. 
 

Web Title: Woman who smuggled gun in her vagina sentence for 10 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.