विरार - शाब्दिक बाचाबाचीनंतर एका चिडलेल्या महिलेने रिक्षाचालकाला भररस्त्यात चाकूने भोसकण्याचा प्रयत्न केला. विरारमध्ये मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली.विरारच्या अगरवाल सिटी परिसरात ही घटना घडली. महिला आणि रिक्षाचालकाने परस्परांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.विरारच्या पश्चिमेकडे दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंजीती कौर-भोसले (५०) या दुचाकीवरून चालल्या होत्या. त्यांच्या दुचाकीची धडक दुर्गेश पाटील (वय ३५) याच्या रिक्षाला लागली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दुर्गेशने रागाच्या भरात महिलेच्या कानाखाली लगावली. त्यानंतर संतापलेल्या महिलेने तिच्याजवळील किर्पाण बाहेर काढला आणि दुर्गेशच्या पोटात भोकसण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या इतर रिक्षाचालकांनी मोबाइलमध्ये काढला. महिला आणि रिक्षाचालकांमध्ये जोरदार वाद झाला. व्हिडिओत इतर रिक्षाचालक त्या महिलेला जाण्यास आणि चाकू ठेवण्यास विनंती करत आहेत. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर हात उगारल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या वादानंतर रिक्षाचालक आणि संबंधित महिला अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी परस्परांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
खळबळजनक! महिलेने रिक्षाचालकाला भररस्त्यात चाकूने भोसकण्याचा केला प्रयत्न
By पूनम अपराज | Updated: October 23, 2020 21:55 IST
Stabbing : महिला आणि रिक्षाचालकाने परस्परांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
खळबळजनक! महिलेने रिक्षाचालकाला भररस्त्यात चाकूने भोसकण्याचा केला प्रयत्न
ठळक मुद्देमंजीती कौर-भोसले (५०) या दुचाकीवरून चालल्या होत्या. त्यांच्या दुचाकीची धडक दुर्गेश पाटील (वय ३५) याच्या रिक्षाला लागली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.