वाशी खाडीपुलावरून उडी मारून महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 21:11 IST2019-02-11T21:10:33+5:302019-02-11T21:11:04+5:30
या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत पोलीस तपास करत आहेत.

वाशी खाडीपुलावरून उडी मारून महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न
नवी मुंबई - वाशी खाडीपुलावरुन एका महिलेने उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दैव बलवत्तर होतं म्हणून जीव संपवायला गेलेल्या महिलेला मच्छीमार सचिन भोईर हे मदतीसाठी धावून गेले. भोईर यांनी आत्महत्या करण्यास गेलेल्या महिलेचा जीव वाचविला असून वाहतूक पोलिसांनी महिलेला पुढिल उपचारकरीता वाशी मनपा हॉस्पिटल येथे तिला दाखल केले आहे. या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत पोलीस तपास करत आहेत.