निर्दयी! अनोळखी पुरुषासोबत बोलत होती महिला; सासरच्या लोकांनी पाहिलं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 01:47 PM2021-09-28T13:47:14+5:302021-09-28T13:48:38+5:30

रामपूर पोलिसांनी सांगितले की, ज्या व्यक्तीसोबत ही महिला बोलत होती त्याने सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Woman Tied To Tree, Beaten Mercilessly By In-Laws For Talking To Stranger in UP | निर्दयी! अनोळखी पुरुषासोबत बोलत होती महिला; सासरच्या लोकांनी पाहिलं, मग...

निर्दयी! अनोळखी पुरुषासोबत बोलत होती महिला; सासरच्या लोकांनी पाहिलं, मग...

Next
ठळक मुद्देया तक्रारीच्या आधारे सासरच्या ४ लोकांसह १९ अज्ञातांविरोधात आयपीसी कलम ३२३, ३५५ अंतर्गत प्राथमिक गुन्हा नोंदवण्यात आला तो घरातून बिलासपूरला परतत असताना रस्त्यात महिलेला पाहिलं आणि तिच्याशी बोलणं सुरू केलेतक्रारकर्ता मूळचा उत्तराखंडमधील रुद्रपूर येथील रहिवासी आहे. तो रामपूरला येऊन जाऊन असतो.

रामपूर – उत्तर प्रदेशातील रामपूर इथं एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. याठिकाणी एका महिलेला अनोळखी पुरुषाशी बोलणं महागात पडलं आहे. एका व्यक्तीसोबत बोलताना महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी पाहिलं आणि तिला झाडाला बांधून मारहाण केली. ही घटना रामपूरच्या बिलासपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. १७ सप्टेंबरला घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दयेची याचना करत राहिली महिला

कथित व्हिडीओत एका महिलेला झाडाला लटकवलेलं पाहायला मिळू शकतं. त्यात सासरच्या लोकांकडून तिला बेदम मारहाण होत आहे. व्हिडीओत महिला वेदनेने जोरजोरात रडताना दिसते तसेच मारहाण करणाऱ्यांकडे दयेची याचना करतेय. या प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. रामपूर पोलिसांनी सांगितले की, ज्या व्यक्तीसोबत ही महिला बोलत होती त्याने सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे सासरच्या ४ लोकांसह १९ अज्ञातांविरोधात आयपीसी कलम ३२३, ३५५ अंतर्गत प्राथमिक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनास्थळी पळून जाण्यात अनोळखी व्यक्ती यशस्वी

तक्रारकर्त्याच्या मते, तो घरातून बिलासपूरला परतत असताना रस्त्यात महिलेला पाहिलं आणि तिच्याशी बोलणं सुरू केले. हे दृश्य एका स्थानिक ग्रामस्थाने पाहिलं आणि त्याने महिलेच्या सासरच्या मंडळींना सूचित केले. त्यानंतर सासरकडील लोक घटनास्थळी पोहचले. संधी मिळताच महिलेसोबत बोलणारा अनोळखी इसम पळून जाण्यास यशस्वी झाला. परंतु महिलेला एका झाडाला बांधण्यात आले आणि त्याठिकाणी तिला बेदम मारहाण करण्यात आली.

प्रेमप्रसंगाचा आरोप करून सासरच्या मंडळींकडून मारहाण

रामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संसार सिंह म्हणाले की, तक्रारकर्ता मूळचा उत्तराखंडमधील रुद्रपूर येथील रहिवासी आहे. तो रामपूरला येऊन जाऊन असतो. कारण रामपूरमध्ये या इसमाची संपत्ती आहे. तो व्यक्ती महिलेसोबत बोलत होता. तो महिलेला ओळखत असल्याचा दावा केला. परंतु महिला आणि व्यक्ती बोलत असताना सासरच्या मंडळींनी पाहिलं आणि त्यांच्यावर हल्ला केला. यात व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाला तर महिलेला बेदम मारहाण केली. सासरच्यांचा आरोप आहे की, या महिलेचे त्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहेत म्हणून मारहाण केली.

Web Title: Woman Tied To Tree, Beaten Mercilessly By In-Laws For Talking To Stranger in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Policeपोलिस