दारू पिऊन गाडी चालवणं महिलेला पडलं महाग; झाली गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 14:16 IST2018-07-19T14:15:38+5:302018-07-19T14:16:39+5:30
पतीविरोधात तक्रार करण्यासाठी निघाली होती महिला

दारू पिऊन गाडी चालवणं महिलेला पडलं महाग; झाली गंभीर जखमी
मुंबई - कल्याणमध्ये खड्ड्यामुळे बळी गेले असताना तसेच ठिकठिकाणी अपघात होत असताना ताडदेव येथे स्कुटी खड्ड्यात जाऊन पडल्याने एक तरुणी गंभीर जखमी झाली. आदिती काडगे असे या तरुणीचे नाव असून ती दारू पिऊन स्कुटी चालवीत होती असे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे.
फोरजेट हिल येथील जय हरी सोसायटीमध्ये आदिती पतीसोबत राहते. मंगळवारी रात्री घरातच तिचे पतीसोबत जोरदार भांडण झाले. दारूच्या नशेत असलेली आदिती स्कुटी घेऊन ताडदेव पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी निघाली. तिच्या पाठोपाठ पतीही निघाला. रात्रीचा अंधार आणि दारूची नशा यामुळे पोलिस ठाण्याबाहेरील रस्त्यावरचा खड्डा तिला दिसला नाही. स्कुटीसह आदिती खाली कोसळली. तिच्या डोक्याला मार लागला. पोलिस आणि पतीने तिला भाटिया रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर बेशुद्ध पडलेल्या आदितीला सकाळी शुद्ध आली. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ताडदेव पोलिसांनी दिली.