शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

हुंड्यासाठी महिलेचे मुंडण करून काढली धिंड, बेशुद्ध पडल्यावर दिले फेकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:17 IST

Woman shaved off her head for dowry : कोतवाली हाथरस गेट परिसरातील एका गावात राहणाऱ्या या महिलेचे सात वर्षांपूर्वी अलीगढमधील अकराबाद भागातील एका तरुणासोबत लग्न झाले होते.

अलीगढ - हुंड्याच्या भुकेल्या लांडग्यांनी पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासला आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्यांनी महिलेचे मुंडण करून तिला बेशुद्धावस्थेत कालव्याच्या काठावर फेकून दिले. अलिगढ जिल्ह्यातील  अकराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडलेल्या या घटनेचा गुन्हा हाथरसच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार महिला पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.कोतवाली हाथरस गेट परिसरातील एका गावात राहणाऱ्या या महिलेचे सात वर्षांपूर्वी अलीगढमधील अकराबाद भागातील एका तरुणासोबत लग्न झाले होते. तिच्या सासरच्यांनी हुंड्याची मागणी करत छळ सुरू केल्याचा आरोप आहे. सासरचे लोक तिला अनेकदा मारहाण करायचे.महिलेच्या म्हणण्यानुसार, हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने 14 एप्रिल रोजी सासरच्या लोकांनी तिचे मुंडण केले आणि तिला परिसरात फिरवले. एवढेच नाही तर या लोकांनी त्याला बेशुद्धावस्थेत अलिगढ रोडवरील कालव्याजवळ असलेल्या त्याच्या गावाजवळ सोडले.हा प्रकार पीडितेच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी तिला त्यांच्या घरी आणले. त्यानंतर हे लोक पोलिस ठाण्यात गेले, मात्र पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही. या लोकांनी पुन्हा पोलिस अधीक्षकांकडे दाद मागितली, त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणी विवाहितेचा पती अलीमुद्दीन आणि इतर काही सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिला स्टेशन प्रभारी विपिन चौधरी सांगतात की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdowryहुंडाWomenमहिलाUttar Pradeshउत्तर प्रदेश