गुंगीचे औषध देत महिला पोलिस कॉन्स्टेबलवर अत्याचार, मुंबईतील पोलिस दलात कार्यरत

By मुरलीधर भवार | Updated: May 26, 2023 17:58 IST2023-05-26T17:57:22+5:302023-05-26T17:58:56+5:30

कोळसेवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरु

Woman police constable assaulted by giving medicine | गुंगीचे औषध देत महिला पोलिस कॉन्स्टेबलवर अत्याचार, मुंबईतील पोलिस दलात कार्यरत

गुंगीचे औषध देत महिला पोलिस कॉन्स्टेबलवर अत्याचार, मुंबईतील पोलिस दलात कार्यरत

मुरलीधर भवार, कल्याण: एका महिला पोलिस कॉन्स्टेबलला गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सोबत वारंवार शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर जातीचे कारण देत तिला लग्नास नकार दिला गेला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पिडीत महिला पोलिसाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

पिडीत महिला पाेलिस ही मुंबईतील पोलिस दलात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी तिची इंस्टाग्रामवर आकाश घुले नामक तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. तो तिला भेटण्याच्या बहाण्याने घरी केला. गुंगीचे आैषध देऊन तिच्यावर त्याने बलात्कार केला. तिला त्याने लग्नाचे आमिष दाखविले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरीक संबंध ठेवले. तिेन त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावला असता त्याने जातीचे कारण देत लग्नास नकार दिला. पिडीतने कोशळेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी तिची तक्रार दाखल करुन आकाशच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस आकाशचा शोध घेत आहेत.

Web Title: Woman police constable assaulted by giving medicine