घरी एकटी असताना महिलेची गळा कापून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 23:15 IST2019-04-29T23:15:00+5:302019-04-29T23:15:02+5:30
मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला असून पुढील तपास करत आहे.

घरी एकटी असताना महिलेची गळा कापून हत्या
नालासोपारा - विरार पूर्वेकडील साईनाथ पेट्रोल पंपाच्या जवळील विभागात राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेची शनिवारी संध्याकाळी घरी एकटी असताना कोणीतरी अज्ञात कारणाने चाकूच्या सहाय्याने गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण विभागात भीतीचे वातावरण पसरले आहे. विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला असून पुढील तपास करत आहे.
विरार पूर्वेकडील साईनाथ पेट्रोल पंपाजवळील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये रूम नंबर बी/302 मध्ये राहणाऱ्या मयुरी महेश मोरे (27) यांची शनिवारी संध्याकाळी साडे सात ते साडे आठच्या दरम्यान घरी कोणी नसताना कोणीतरी अज्ञात कारणांमुळे चाकूच्या साहयाने गळा चिरून हत्या केली आहे. मयुरी हिचे पती कामावरून घरी परतल्यावर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडल्यानंतर विरार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. विरार पोलिसांनी रात्री 1 च्या सुमारास हत्येचा गुन्हा दाखल करून ही हत्या कोणी व कोणत्या कारणावरून केली आहे याचा पोलीस शोध घेत पुढील तपास करत आहे.